अमळनेरात ग्राहक सेवा मार्गदर्शन केंद्र लवकरच सुरू होणार

अमळनेर-
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर  तालुक्याची मासिक बैठक तालुका अध्यक्ष मकसूदभाई बोहरी यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे सचिव विजय शुक्ल यांच्या निवासस्थानी संपन्न झाली या बैठकीत 22 सदस्य उपस्थित होते.
अमळनेरात ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र लवकरच सुरू होणार असून ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे  ग्राहक मार्गदर्शन केंद्र शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी पांच ते सात या वेळेत तालुका अध्यक्ष मकसूद भाई बोहरी यांच्या शॉपिंग सेंटर मध्ये सुरू राहणार आहे त्याच बरोबर जागतिक महिला दिनानिमित्त ग्राहक पंचायत एक आगळा-वेगळा कार्यक्रम घेण्यात येणार आहे या मासिक बैठकीचे प्रास्ताविक मकसूदभाई बोहरी यांनी तर सूत्रसंचालन सचिव विजय शुक्ल व आभार प्रदर्शन राजेंद्र सुतार यांनी मानले.
या मासिक बैठकीसाठी तालुका अध्यक्ष मकसूद भाई बोहरी तालुका संघटक राजेंद्र सुतार सचिव विजय शुक्ल, ॲड. भारती अग्रवाल ऊर्जा मित्र सुनील वाघ सतीश मुंडके, मधुकर सोनार महेश कोठावदे तसेच सौ करुणा सोनार, सौ.कपिला मुठे, अरविंद मुठे, खदीर सादिक, जयंतलाल वानखेडे सौ.वनश्री अमृतकर, सौ.अंजु ढवळे, ॲडव्होकेट उर्मीला अग्रवाल श्रीमती लता दुसाने हे उपस्थित होते तसेच आमंत्रित म्हणून महेश पाटील अनिल वाणी, गुरुनामल बठेजा, सौ.अरुणा अलई हे उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.