अमळनेर- येथील मुंदडा नगर मध्ये असलेले व शहरात अल्पावधीतच "प्रति शेगाव" म्हणून नावारूपाला आलेल्या संत गजानन महाराज मंदिरात आज (दि.१५ रोजी) संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष श्री आर.बी. पवार यांनी सांगितले.
असा असेल कार्यक्रम
दि.१५ फेब्रुवारी रोजी प्रगट दिना निमित्त आयोजित कार्यक्रम
सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत पादुका पूजन,
१० ते ११ वाजेपर्यंत २१ व्या अध्यायाचे सामूहिक वाचन,
दुपारी ११ वाजेला महाआरती व त्या नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
यासाठी संस्थानचे अध्यक्ष श्री आर.बी.पवार, सौ. ज्योती पवार,गजानन भक्त गोपाल पाटील,आनंद पाटील ,प्रविण पवार,चेतन उपासनी,नितीन भावे,रघुनाथ पाटील,मोहीत पवार,श्रीकृष्ण चव्हाण ,विजय येवले, पंकज येवले ,महिला सेवेकरी सरला चव्हाण,इंदिरा येवले, शोभा कोळी,मंगला धनगर,वंदना भारती,मंगला पाटील, बबीता पवार आदी परिश्रम घेत आहेत.
अमळनेर तालुक्यातील गजानन महाराज भक्तांनी या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------------------------------------------------------------------------



