अमळनेरात जल्लोषात शिवजयंती साजरी शहरात मिरवणूकीने वातावरण झाले शिवमय


अमळनेर -
संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभर अत्यंत धडाक्यात साजरी करण्यात आली. अमळनेर शहरातही शिवजयंतीचा उत्साह वाखाणण्यासारखा होता.
वेगवेगळ्या भागातून मित्र मंडळ,संस्था,संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे व मिरवणूकांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील पाचपावली देवी मंदीर,
तांबेपूरा-साने नगर,ढेकू रोड,शिरूड नाका,मिल चाळ,बंगाली फाईल या भागात शिव प्रतिमा,मुर्ती,सजीव देखावा व बॅड,ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. 
अमळनेकरांची मानाची शिवजयंती
        सर्व शिव प्रेमींनी एकत्र येत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.पोलीस कॉलनीतील पाचपावली देवी मंदीराजवळ अमळनेरचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली व मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला. रणजीत शिंदे सर यांच्या चि.शिवतेज या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पाचपावली मंदिरात सुरुवातीला नाश्ता वाटप करण्यात आला.पवन चौधरी, मयूर चौधरी,सिद्धू चौधरी यांच्याकडून मिरवणुकीत लस्सी वाटप करण्यात आली.
निखिल चव्हाण व तुषार सोनार यांच्याकडून पिण्याचे थंड पाणी वाटप करण्यात आले. शिवजयंती मिरवणूकीत चिमुकला बाल शिवाजी महाराजांच्या वेषभुषेत सर्वाना आकर्षित करीत होता. महाराणा प्रताप चौक येथील वीर तान्हाजी यांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले.मिरवणूकीत दोन बॅड पथक,एक महिला ढोल पथक सहभागी झाले होते. आ.अनिल पाटील,साहेबराव 
पाटील,पो.नि.अंबादास मोरे व गोपनीय शाखेचे अंमलदार शरद पाटील यांनी सुद्धा शिवगीतांवर ठेका धरला.
   मिरवणूकीचा मार्ग
      मिरवणुक पाच पावली मंदीर येथून सुरवात होऊन पवन चौक , बस स्टॅन्ड, विजय मारुती मंदीर, महाराणा प्रताप चौक,स्टेशन रोड या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे समारोप झाला.
आकर्षक सजीव देखावा
    मिरवणुकीत बाल शिवाजी, मंगळग्रह संस्थानचा सर्व धर्म समभाव देखावा,लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वराज्य संकल्प प्रतिज्ञा हा सजीव देखावा मुलभुत आकर्षण ठरले.
भव्य मिरवणुकीत सहभागी हजारो शिवभक्तांना शिवतेज रणजित शिंदे यांच्या प्रथम जन्मदिवसाच्या निमित्ताने पोलिस उपविभागीय अधिकारी राजेंद्र सासणे,अमळनेर पोलिस निरीक्षक अंबादास मोरे,यांच्या शुभहस्ते अल्पोपहार वितरित करण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,मनोज शिंगाणे, पारस धाप यांचेसह पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी मिरवणूकीच्या सुरवातीला शिवतेजच्या वाढदिवसाचा केक ही कापण्यातआला.शिवजयंती मिरवणुकीत वाढदिवस साजरा करून पारंपरिक वाढदिवस साजरा करण्याला फाटा देत वेगळी प्रथा रणजित शिंदे व सौ शैलजा शिंदे या दांपत्याने निर्माण केली आहे.
मान्यवरांचा सहभाग
         शहरातील सर्वच भव्य मिरवणूकांमध्ये आमदार स्मिता वाघ,आमदार अनिल पाटील,
मा.आमदार साहेबराव पाटील आदींसह नगरसेवक,सामाजिक,शैक्षणिक व राजकीय पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली.
-----------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.