सी.आर.पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे शिवजयंती उत्साहात साजरी

अमळनेर-
शहरातील तांबेपूरा भागातील कनिष्क फाऊंडेशन संचलीत सी.आर.पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 
     शाळेचे चेअरमन महेश पाटील आणि मुख्याध्यापिका सौ.नूतन महेश पाटील यांच्या हस्ते छत्रपतीशिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
 शिवशक्ती चौक,तांबेपूरा येथेही  प्रतिमेचे पूजन करण्यातआले व त्या ठिकाणी शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी छ.शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाल शिवाजी राजांची तर विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊची भूमिका सादर केली.
तांबेपूरा भागात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली.
विद्यार्थ्यांनी  जल्लोषात घोषणा दिल्या. 
----------------------------------------------------------------------–-------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.