साने गुरुजी विदयालयात शिवजयंती साजरी

अमळनेर-
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येथील साने गुरुजी विद्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा उद्योगपती  भैय्यासाहेब विनोद पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव संदीप घोरपडे,संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सहसचिव अॅड.अशोक बाविस्कर, मुख्याध्यापक एस.डी.देशमुख, मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. विदयार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायिला तर विद्यार्थांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनोदभैय्या पाटील,संदीप  घोरपडे, एस.डी.देशमुख, श्रीमती अनिता बोरसे यांनी विदयार्थांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुकेश पाटील यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी,सर्व  विद्यार्थी - विदयार्थिनी यांची उपस्थिती होती.
--------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.