अमळनेर - संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन शाखा अंमळनेरच्या वतीने व मंडळाच्या सद्गुरु माता सुदिक्षा हरदेवसिंह जी महाराज यांच्या आदेशानुसार यंदाच्या वर्षी भारतात सुमारे ४०० शहरातून ११६५ हॉस्पिटलमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
अमळनेर येथील संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशनच्या वतीने व मंडळाच्या साधकांनी येथील ग्रामीण शासकीय रुग्णालयात स्वच्छता मोहीम पार पाडली. दरवर्षाप्रमाणे यंदादेखील कधी रेल्वे स्टेशन, बस स्टँड ,आणि ह्या वर्षी अमळनेर येथील शासकीय रुग्णालय स्वच्छ केले.

सफाई अभियान सुरू होण्यापूर्वी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताडे , संत निरंकारी मंडळाचे धुळे झोन ३६ ब चे झोनल इंचार्ज श्री हिरालाल पाटील,अमळनेर ब्रँचचे प्रमुख श्रीचंद निरंकारी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी डॉ. प्रकाश ताडे यांनी स्वच्छता ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक घटक असून रोगराई पासून सुटका मिळवण्यासाठी स्वतः
पासून स्वच्छतेची प्राथमिक सुरुवात करणे गरजेचे आहे. स्वच्छता व रोगराईमुळे कोणते कोणते आजार होऊ शकतात याबाबत डॉ. ताडे यांनी मार्गदर्शन केले. स्वच्छता अभियानास संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन चे सेवादल व साध संगत मिळून शेकडो साधकांनी सहभाग घेतला आणि स्वच्छतेची शपथ घेतली.
स्वच्छता ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असून परिसरातील वाढत्या रोगराई पासून मुक्तता मिळवण्यासाठी सर्वांनी स्वतःपासूनच स्वच्छता करण्याची गरज आहे वाढत्या रोगराईमुळे अनेकांना आजाराचा सामना करावा लागतो यासाठी सर्वांनी स्वच्छता राखणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.तसेच यावेळी संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशनच्या वतीने स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.ग्रामीण
रुग्णालयाची स्वच्छता बघून डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी निरंकारी मंडळाचे कौतुक केले. याप्रसंगी अमळनेर ब्रँच प्रमुख श्रीचंद निरंकारी यांनी उपस्थित डॉक्टर्स आणि साधकांचे आभार मानले आणि स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. याप्रसंगी सेवादल संचालक कैलास डिंगराई, शशिकांत पाटील, ग्यानजी निरंकारी,आर.डी.महाजन, मयुरी महाजन,उज्वला महाजन,अनिता पाटील, राजेश नरेन्द्र पाटील ,
गोपाल रवींद्र बोरसे, तेजस्वी नरेंद्र पाटील,वैशाली बोरसे, कोमल बोरसे, दुर्गाबाई बोरसे, गणेश जाधव, रजनीश पंजवानी,करण जाधव,सुनील बठेजा, प्रीती बठेजा, हर्षल पंजवणी, विशाल डिंगराई, प्रीती माधवाणी,दिशा विजय पंजवाणी, राकेश पाटील, हितेश डिंगराई, मनोज कियानी,
किशोर डावराणी,सुरज पंजवानी,
घनश्याम पंजवानी,अमित निरंकारी,संदीप धर्मानी, लक्ष डिंगराई ,रोशनी डिंगराई, तंनू डिंगराई, सुशीलाजी निरंकारी, हेमा कोडवानी, पायल पंजवानी, पूनम सिंधी,राखी बठेजा,कृष्ण बठेजा,सुनील बठेजा,माला माधवाणी,राकेश भावनांनी,भागचंद हिंदुजा आदी उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------------------------



