अमळनेर - संपूर्ण राज्यात कमी मायक्रॉनच्या प्लॅस्टिक कॅरीबॅग वापरण्यावर बंदी असतांनाही काही व्यापारी या कॅरीबॅगची विक्री करीत असल्याने अमळनेर नपाच्या भरारी पथकाने या कॅरीबॅग जप्त केल्या आहेत व चार विक्रेत्यांना एकूण ३० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. तर दोन विक्रेत्यांनी दंड भरण्यास नकार दिला आहे.
राज्य सरकारने प्रदुषणास कारणीभूत ठरत असल्याच्या कारणास्तव कमी मायक्रॉनच्या कॅरीबॅग वापरण्यास बंदी घातली आहे. तरीही काही विक्रेते या प्रकारच्या कॅरीबॅगची विक्री किंवा वापर करीत असल्याने मागील काही दिवसात नगर परिषदेच्या पथकाने बाजारात दुकानांची तपासणी केली होती. त्यावेळी काही दुकानदारांना दंड ठोठावला होता.
आज देखील न.पा.च्या मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या पथकाने बाजारात दुकानांची तपासणी केली. दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात कॅरीबॅग जप्त केल्या आहेत.यामुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

आज देखील न.पा.च्या मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या पथकाने बाजारात दुकानांची तपासणी केली. दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात कॅरीबॅग जप्त केल्या आहेत.यामुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
यांचेवर झाली कारवाई
भरारी पथकाने पुढील प्रमाणे कारवाई केली आहे. त्यात दुकानाच्या नावापुढे जप्त केलेला माल व दंड नमुद केला आहे.

नितीन ताराचंद कोळी (४ किलो,५हजार रूपये),मोहन पेसुमल हिंदुजा (४.३०किलो,५ हजार रुपये),सलीम इक्बाल कच्छी (८६ किलो,१० हजार रुपये),धर्मा प्रोव्हीजन (४२ किलो,१०हजार रुपये) याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तर दिलीप वाणी (१६ किलो),रविंद्र श्रीचंद निरंकारी (२.५ किलो) अशा कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या असून या दोन विक्रेत्यांनी दंड भरण्यास नकार दिला आहे असे कळते.

यांनी केली कारवाई
अमळनेर नपाच्या मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्यासह संजय चौधरी,संतोष बि-हाडे,अरविंद कदम,राधेश्याम अग्रवाल,अनिल बाविस्कर व सफाई कर्मचारी यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे. या कठोर कारवाईमुळे विक्रेत्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. कॅरीबॅग न वापरण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज आहे.
----------------------------------------------------------------------------------



