शेतकरी व महिला अन्याय विरोधात शासनाचा निषेध आ.स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन

अमळनेर -
राज्यातील महाविकास आघाडीचे शासन जनतेचे हित साधण्यात अपयशी ठरले आहे. शासनाने निवडणूक काळात घोषणा केलेली कर्जमाफी न देता शेतकरी घटकाची फसवणूक केली आहे. तर या शासनाच्या काळात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हे अपयशी व स्थगिती सरकार आहे अशी टीका विधान परिषद सदस्या व भाजपा प्रदेश चिटणीस आ.स्मिता वाघ यांनी केली आहे. येथील तहसिल कार्यालयाच्या बाहेर भाजपाच्या धरणे आंदोलन प्रसंगी त्या बोलत होत्या. 

             राज्यातील शिवसेना,
राष्ट्रवादी व कॉंग्रेस महाविकास आघाडी शासनाच्या निषेधार्थ भाजपाने सर्व तालुकास्तरावर धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते. अमळनेर तहसिल कार्यालयाच्या बाहेरही भाजपाने धरणे आंदोलन केले.शासनाच्या धोरणाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  यावेळी आ.स्मिता वाघ,अॅड.ललिता पाटील,तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,पं.स.सभापती रेखा पाटील,कृउबा समितीचे सभापती प्रफुल्ल पवार,जि.प. सदस्या सोनू भिल,माजी सभापती श्याम अहिरे,दीपक पाटील,महेश पाटील,गिरीश पाटील,पराग पाटील,शितल देशमुख,राकेश पाटील, भरत ललवाणी,जिजाबराव पाटील,राहुल पाटील,बबलू राजपूत,श्याम लुल्ला,संजय शाह,शरद सोनवणे,झुलाल पाटील,नाटेश्वर पाटील,शत्रृघ्न पाटील,देवालांडगे,पंकज भोई,योगीराज चव्हाण,राहुल चौधरी,महेंद्र पाटील,घनश्याम पाटील,शिवाजी राजपूत,मच्छींद्र पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांना निवेदन देण्यात आले.
--------------------------------------------------------------------------------


ओम टी पान मसाला च्या नविन दालन

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.