आरोपीना जळगाव येथून घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनला पिंप्रीजवळ अपघात

अमळनेर -
जळगावहून कोर्टकामासाठी अमळनेर येथे आरोपीना घेऊन जाणारी व्हॅन धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावाजवळ पलटी झाल्याची घटना आज दुपारी घडली. यात १२ जण जखमी झाले असून काही गंभीर दुखापत झाली असल्याचे कळते. एमएच -१९ -०५४५ हि पोलीस व्हॅन जळगाव येथून अमळनेर येथे जात असताना व्हॅन पिंप्रीखुर्द येथे पलटी झाल्याने यात १२ जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गंभीर जखमींना जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
--------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.