मारवड पोलीसांचा निम शिवारात हातभट्टीवर छापा

अमळनेर -
तालुक्यातील निम शिवारातील हातभट्टीच्या अड्डयावर मारवड पोलीसांनी आज छापा टाकला.या छाप्यात काही वस्तू व दारू बनविण्यासाठी लागणारे कच्चे रसायन जप्त करण्यात आले आहे. 
       याबाबतची अधिक माहिती अशी की,निम शिवारात आरोपी‌ एकनाथ नामदेव कोळी (रा.निम)  याचे शेतात छापा मारुन १)४५००/-रु. किमतीचे दोन ५० लिटर मापाचे प्लॅस्टीक कॅन व त्यात सुमारे १०० लिटर गुळ रसायन मिश्रित रसायन.  पत्र्याचा २०० लिटर मापाचा ड्रम त्यात ५०लिटर रसायन किंमत अंदाजे  २६००/- रुपये.  २०लिटर मापाचा प्लॅस्टीक कॅन त्यात सुमारे १५ लिटर गावठी हातभट्टीची दारु आंबट व उग्र वासाची किंमत अंदाजे   ३००.००/- रूपये. एक जिवंत हातभट्टी त्यात एक पत्र्याचा ड्रम,गाळणी,एक प्लॅस्टीक पाईप,तगारी,जळाऊ लाकूड  वगैरे साहीत्य असे एकुण:५१००/-रुपये किंमतीचा माल जागीच पकडुन नष्ट केला आहे.सदर घटनेबाबत मारवड पोलीस स्टेशनला मुंबई पोलीस अधिनियम कलम ६५(क)(ड)(ई)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात पोलीस कारवाईत पो.ना.३१८२ मुकेश साळुंखे ,पो.ना.१६९३ विशाल चव्हाण यांचा समावेश होता.ग्रामीण भागात पोलीसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणा-यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.