मुंबईच्या मरिन ड्राईव्हची अमळनेरात अनुभुती पोस्ट ऑफिस ते लालबाग शॉपिंग पर्यंतच्या रस्त्याचे बदलले रूप

अमळनेर -
शहरातील मुख्य परिसर असलेला प्रभाग क्रमांक ९ म्हणजेच न्यू प्लॉट मधील पोस्ट ऑफिस ते लाल बाग शॉपिंग सेंटर परिसरातील रस्ता रुंदीकरण सह दुभाजक व काँक्रेटिकरण करण्यात आले.तसेच रस्त्यावर मध्यभागी विद्युत खांबावर आकर्षक पथदिवे लावुन रोषणाई केली.या पथदिव्यांचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण करण्यात आले. या रस्त्यावर ३ हायमास्ट,९ विद्युत दिवे लावण्यात आले आहेत. या नाविन्यपूर्ण उपक्रमा मुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.या उपक्रमाचा खर्च नगरपालिकेच्या फंडातून करण्यात आला आहे.या वेळी या प्रभागांचे नगर सेवक निशांत अग्रवाल,मनोज पाटील,
सामाजिक कार्यकर्ते साखरलाल महाजन,विक्रांत पाटील,न.पा. उपमुख्यधिकारी संदीप गायकवाड, अभियंता  प्रशांत ठाकूर,जितेंद्र कटारिया, अमोल भामरे,अक्षय अग्रवाल, धर्मेंद्र कटारिया,विजय कटारिया, विपुल मुनोत,प्रशांत ठाकूर,ओम कोळी,निशांत गांधी यांच्या सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.रस्ता रुंदीकरण व व्यक्तीकरण केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी मा.आ.साहेबराव पाटील,नगरसेवक निशांत अग्रवाल व नपाच्या प्रशासनाच्या आभार मानले आहेत. 
तर शहरातील सुभाष चौक, व अन्य महत्वाच्या चौकातही अशी विकासकामे होऊन त्यांचाही "लुक" बदलण्यासाठी साहेबराव दादा पाटील व प्रशासनाने कार्यवाही करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
-------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.