अमळनेर - दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्या कुटुंबास शासनाच्या वतीने २० हजार रुपये अनुदान देण्यात येते.
या योजनेंतर्गत तालुक्यातील सहा पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये अर्थ सहाय्याचा धनादेश आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते व तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
काय आहे योजना
दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रुपये २०,०००/- चे अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेसाठी आपल्या गावाचे तलाठी किंवा तहसिल कार्यालयात अधिक माहिती मिळू शकते.
या लाभार्थ्यांना धनादेश वितरीत
तालुक्यातील मालतीबाई सतीश पाटील (ढेकू खुर्द), बेबीबाई रमेश ठाकूर (अमळनेर), कोकिळा शांताराम बोरसे (डांगरी), पुनम कैलास पाटील (शहापूर), सुनंदा संतोष चौधरी (अमळनेर),
यशोदाबाई आबा पारधी (अमळनेर)या सहा लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये सहाय्यता निधीचे धनादेश वितरित करण्यात आले.
-----------------------------------------------------------------------------------



