अमळनेर- येथील नगर परिषद शिक्षण मंडळातील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी पगारदार नोकरांची पतंसंस्था अमळनेर या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. नवनियुक्त संचालक मंडळात भारती पाटील,हिराबाई कलोसे,अन्सारी बुशरा तरन्नुम,
शेख मलिहा तौफिक,अन्सारी तौफिका परवीन, मोमीन साबीर, जावेद अख्तर, रविंद्र पाटील कैलास कोळी ,सुनिल साहेबराव पाटील यांची संचालकपदी निवड झाली आहे. पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुनील साहेबराव पाटील यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच व्हाईस चेअरमनपदी बुशरा तरन्नुम मो.जहुर आन्सारी यांची निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन दुय्यम निबंधक कार्यालयातील श्री.एस.ए.पाटील हे होते व संस्थेचे सचिव पुरकर यांनी सहकार्य केले. या निवडीबद्दल चेअरमन व सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अमळनेर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
---------------------------------------------------------------------------



