अमळनेर नपाच्या प्लॅस्टिक निर्मूलन पथकाची आजही कारवाई दोन दुकानावर दंडात्मक कारवाई,विक्रेत्यांमध्ये खळबळ


अमळनेर -
प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग न वापरण्याबाबत सरकारने कायदा केलेला असला तरीही काही विक्रेते लपून छपून कॅरीबॅगची विक्री करीत असल्याने आज (दि २८) अमळनेर नगर परिषदेच्या प्लॅस्टिक निर्मूलन पथकाने कारवाई करीत रु १०,०००/- ( दहा हजार रुपये ) दंड वसूल केला. त्यात कृष्णा प्रोव्हीजन व श्रीनंद किराणा या दोन दुकानदारांवर प्रत्येकी रुपये ५०००/- असा एकूण दहा हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सदर कारवाई नपाचे आज देखील न.पा.च्या मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या पथकाने बाजारात दुकानांची तपासणी केली व आरोग्य निरीक्षक संतोष बि-हाडे,प्रभारी स्वच्छता निरीक्षक अरविंद कदम, नपाचे मुकादम राधेश्याम अग्रवाल,अनिल बाविस्कर, अनिल बेंडवाल यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. नगर परिषदेच्या कठोर कारवाईमुळे प्लॅस्टिक विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
--------------------------------------------------------------------------------

ओम टी पान मसाला च्या नविन दालन

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.