अमळनेर - छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि.१९ फेब्रुवारी रोजी अमळनेर शहर व तालुक्यात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध संस्था व संघटनांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहराच्या प्रमुख चौकांमध्ये शिवविचार जागवणारे प्रबोधनात्मक संदेश देणारे मोठे डिजीटल बॅनर्स लावण्यात आले आहेत.हे बॅनर्स माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या सौजन्याने लावण्यात आले आहेत. तसेच महाराजांच्या पुतळ्यास पॉलीश मारण्यात येत आहे.
सवाद्य व जल्लोषात निघणार शिवप्रतिमेची मिरवणूक
यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
मिरवणूकीत दोन बँड, महिलांचे १ ढोल पथक व शाळकरी मुलांचे
पथनाट्य देखावे अशा पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी सुरवातीला पाचपावली मंदीर पटांगण,
पोलीस ग्राऊंड जवळ येथे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या
हस्ते आरती करण्यात येणार आहे व सामाजिक कार्यकर्ते
रणजीत शिंदे यांचा चिरंजीव शिवतेज याच्या वाढदिवसानिमित्त
पाचपावली मंदिरात सुरुवातीला अल्पोपहार वाटप करण्यात
येणार आहे. पवन चौधरी, मयूर चौधरी,सिद्धू चौधरी यांच्याकडून
मिरवणुकीत लस्सी वाटप करण्यात येईल.निखिल चव्हाण व तुषार सोनार यांच्याकडून पिण्याचे थंड पाणी वाटप करण्यात येणार आहे.
![]() |
आमदार अनिल पाटील यांच्या
कडून छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीरास लाईटींग सजावट करण्यात येणार आहे.या मिरवणूकीत महिला मंडळांचा सहभाग असणार आहे. मराठी शाळेचे विद्यार्थी शिवरायांचा सजीव देखावा सादर करणार आहेत. तर अॅड. ललीता पाटील स्कुलचे विद्यार्थी लेझीम सादर करणार आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही बालवीर व्यायाम शाळेतर्फे शरबत वाटप करण्यात येणार आहे.तसेच Rdxx dj चे मालक पवन बि-हाडे यांच्यातर्फे नाट्यमंदीर परिसरात सरबत वाटप करण्यात येईल.
मिरवणूकीचा मार्ग-
पाचपावली मंदीरापासून सुरूवात पवन चौक, कारंजा चौक, बस स्टॅंड महाराणा प्रताप चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर येथे समारोप होईल.
भगवे झेंडे व पताकांनी नटले शहर
शिवजयंती निमित्त अमळनेर शहराच्या सर्वच भागामध्ये तरूण मित्र मंडळाने भगवे झेंडे व पताकांनी शहर सुशोभित केले आहे. तर काही युवक आपल्या वाहनांवर भगवे झेंडे लावून उत्सवाची वातावरण निर्मिती करीत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------






