शहरातील पाचपावली देवी मंदिराचा जीर्णोद्धार देवीच्या नवीन मूर्ती अधिकच सुबक व आकर्षक,५० वर्षानंतर झाला जीर्णोद्धार

 - जाहीरात -        

-------------------------------------------------------------------------------

अमळनेर -
  शहरात अतिशय सुप्रसिद्ध असलेल्या पाचपावली देवी मंदीरातील जुन्या मूर्त्यांचा जिर्णोद्धार नुकताच करण्यात आला. यानिमित्त शोभायात्रा,महापूजा व तीर्थप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.   
तीन दिवस धार्मिक विधी
           शहरातील पोलीस कॉलनीमधील जागृत असे पाचपावली देवी मंदीरातील जुन्या मुर्त्यांच्या जिर्णोद्धाराचा कार्यक्रम नुकताच पार पडला.या निमित्त तीन दिवस पुजा विधीचेआयोजन 
करण्यात आले होते. यापूर्वी सन १९७० मध्ये शहरातील प्रसिद्ध उद्योगपती व आर.के.पटेल ग्रुपचे मालक राजधर काळू पाटील यांनी मुर्त्या देऊन स्थापना केली होती.
 त्या मुर्त्या  खंडित आणि जीर्ण अवस्थेत होत्या.या विषयाची माहिती नुकतेच अमळनेर येथे आलेले पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना मिळताच त्यांनी या विषयाला पाठबळ देत मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले.यासाठी आर. के.पटेल ग्रुपने परत एकदा पुढाकार घेत परंपरेनुसार मुर्त्या राजस्थान वरून आणल्या.त्यांची शहरातून शोभा यात्रा काढून मंदिरात स्थापित करण्यात आल्या.आज झालेल्या जीर्णोद्धार पूजेत पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,मितेश पाटील,प्रसाद झारे, महेश कुलकर्णी असे चार यजमान सपत्नीक पूजेस बसले होते.पूजेनंतर संत सखाराम महाराज संस्थांनचे गादीपती ह.भ.प. प्रसाद महाराजांच्या हस्ते पूजा व ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी महाराजांनी या मंदिराविषयी त्यांचे अनुभव सांगत परत एकदा नवरात्रीचा कार्यक्रम उत्कृष्ट रित्या व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
या मान्यवरांची उपस्थिती
        
 यावेळी डीवायएसपी राजेंद्र ससाणे, माजी आमदार साहेबराव पाटील,मा.नगराध्यक्ष विनोद पाटील,नगराध्यक्षा सौ. पुष्पलता पाटील,बिपीन पाटील,वसंत पाटील,गोकुळ बोरसे,मनोज पाटील,शीतल देशमुख,राजू महाले,उमेश धनराळे,किरण पाटील,सुनील चौधरी,अशोक पाटील,धनगर पाटील,मुकुंद विसपुते,प्रदीप अग्रवाल,योगेश मुंदडा,जितेंद्र जैन,महेश कोठावदे,बी आर बोरसे,बाळू कोठारी,बाबू साळुंखे,दीपक कुलकर्णी,प्रकाश लिंगायत आदी उपस्थित होते. 
-----------------------------------------------------------------------------------
ओम टी पान मसाला च्या नविन दालन

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.