पहिली ते आठवींपर्यंतच्या परीक्षा रद्द वर्षभराचे मुल्यमापन बघून निकाल

Saturday, March 21, 2020

/ by Amalner Headlines
----------------------------------------------------------------------
मुंबई - देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर राज्यातील इयत्ता  पहिली ते आठवीं पर्यन्त परीक्षा रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.वर्षभरातील विद्यार्थ्यांचे मापन संकलित करून विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येणार असून,दहावीचा शनिवारी होणारा इतिहासाचा तर सोमवारी होणारा भूगोल विषयाचा पेपर वेळापत्रकाप्रमाणे होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता पहिली ते आठवीं पर्यन्त परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवी पर्यंतच्या राज्यातील परीक्षा यंदा रद्द केल्या असून वर्षभरातील विद्यार्थ्यांचे मापन संकलित करून विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येईल. वर्ग ९ वी आणि ११ वी ची उर्वरित परीक्षा १५ एप्रिल नंतर घेण्यात येईल. दहावीच्या परीक्षा या वेळापत्रकानुसारच होणार आहेत.शनिवारी इतिहास या विषयाचा तर सोमवारी होणारा भूगोल या विषयाचा पेपर वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे.दहावीच्या परीक्षेसंबंधित आवश्यक ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सोडून उर्वरित सर्वांनी घरुन काम करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बालकांनी आणि पालकांनी काळजी घ्यावी. या कालावधीत शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांनी केले.
---------------------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines