----------------------------------------------------------------------
मुंबई - राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षा गायकवाड यांनी इयत्ता १ ली ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या यावर्षी परिक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनीही सीईटी परिक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याचे आज जाहीर केले आहे. राज्यात आणि देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकार सर्वोतोपरी उपोययोजना करत आहे. गर्दी टाळण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सीईटीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. सीईटीची परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिले आहे. येत्या २९ मार्च रोजी सीईटीची परीक्षा होणार होती. आता कोराना व्हायरसच्या संकटामुळे ही परीक्षा ३० एप्रिल रोजी होणार असल्याचे नियोजित आहे. पण कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असाच राहिला तर परीक्षा आणखी पुढे ढकलल्या जाऊ शकतात अशी शक्यता आहे.
सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षाही पुढे ढकलल्या
सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डानेही दहावी आणि बारावीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सीबीएसई बोर्डाने सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे पेपर ३१ मार्च नंतर घेण्याचे जाहीर केले आहे.
No comments
Post a Comment