अमळनेर बाजार समितीचा कट्टी बंदचा ऐतिहासिक निर्णय शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण,निर्णयाचे स्वागत

Thursday, March 19, 2020

/ by Amalner Headlines
----------------------------------------------------------------------------
                       - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------------------------
अमळनेर -
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या १९ ते २० वर्षापासून शेतमाल भुईकाट्यावर मोजमाप करत असतांना क्विंटल मागे १ किलो याप्रमाणे कापली जाणारी कट्टी बंद करण्याचा ऐतीहासीक निर्णय कृषि उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे. सभापती श्री प्रफुल्ल हिरालाल पाटील व उपसभापती अँड.श्रावण सदा ब्रम्हे व सर्व संचालक मंडळाने हा निर्णय विधान परिषद सदस्या आमदार स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनाने घेतला आहे. या निर्णयात व्यापारी बंधुसह आडत असोसिएशन, हमाल मापाडी बंधु यांचे अनमोल सहकार्य़ लाभले.
     या बाबत सविस्तर वृत्त असे की,अमळनेर कृषि उत्पन्न बाजार समितीत सन २००१ पासुन ते आज पावेतो शेतक-यांचा विक्रीस आलेला शेतमाल भुईकाट्यावर मोजमाप केले असता प्रति क्विंटलला १ किलो कट्टी कापली जात होती. त्यामुळे शेतक-यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते.या सर्व बाबींचा विचार करुन आमदार स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनाने बाजार समितीचे सभापती श्री.प्रफुल्ल हिरालाल पाटील व उपसभापती अँड.श्रावण सदा ब्रम्हे व सर्व संचालकांनी कट्टी पद्धत बंद करण्याचा ऐतिहासीक निर्णय घेतला या निर्णयास व्यापारी बंधु सह आडत असोसिएशन व हमाल मापाडी बंधु यांनीही अनमोल सहकार्य केले.
       या निर्णयामुळे शेतक-यांचे होणारे आर्थिक नुकसान थांबणार असुन शेतकरी हिताचा निर्णय बाजार समितीने सर्वसंमतीने घेतल्याने शेतकरी वर्गासह तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
   - प्रफुल्ल पाटील ,सभापती 
     कृ.उ.बाजार समिती,अमळनेर
------------------------------------------------------------------------------
ओम टी पान मसाला च्या नविन दालन(ओम स्विटस)9422296561


No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines