शहर व तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत काटे यांनी वाटले वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्क आणि हॅन्डग्लोज

Thursday, March 19, 2020

/ by Amalner Headlines
-----------------------------------------------------------------------------
                         - * जाहीरात * -
------------------------------------------------------------------------------
अमळनेर - 
जगभरात वाऱ्यासारखा पसरणारा कोरोना व्हायरसशी वृत्तपत्र विक्रेते व वितरकांचा जवळचा संबंध येतो.
कारण वृत्तपत्र विक्री करणारे रोज सकाळी अनेक ग्राहकांना हातात पेपर देतात.यामुळे या वाटप करणाऱ्यांनाही या संसर्गजन्य रोगाची लागण होऊ शकते.या सर्व गोष्टी लक्षात घेता येथील पुण्यनगरीचे पत्रकार तथा शहर व तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत प्रभाकर काटे यांनी स्व:खर्चाने १०० मास्क व हॅन्डग्लोज शहरात वृत्तपत्र विक्री करणारे विक्रेते व घरोघरी वितरण     करणारे तरुण यांना येथील जि.प.शासकीय विश्राम गृहात आयोजित कार्यक्रमात वाटप करण्यात आले.सोबतच पत्रकार जयश्री साळुंखे व मिलिंद पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले होते.कार्यक्रमात जयश्री साळुंखेनी सत्काराला उत्तर देत आयोजकांचे कौतुक करत यातील २ गरीब मुलांचे पुढील आर्थिक वर्षात शैक्षणिक कामास लागणारा खर्च स्वीकारला तर अध्यक्षीय भाषणात डिगंबर महाले यांनी  स्वखर्चाने मास्क आणि हॅन्डग्लोज वाटप करणारे माजी अध्यक्ष चंद्रकांत काटे या व्यक्तीचे कौतुक करावे तेवढं कमी असून या वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती वाईट असेल त्यांचा शिक्षण व इतर खर्च मंगळ ग्रह संस्था करेल तरी आपण नावे द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार उमेश काटे यांनी मानले.
     यावेळी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत काटे,अरुण सोनटक्के,पांडुरंग पाटील,दिलीप ललवाणी,लीनेश खैरनार,विवेक पाटील,भरत पवार,भटेश्वर वाणी,
सचिन चव्हाण,गौतम बिऱ्हाडे, जितेंद्र पाटील,ईश्वर महाजन,मिलिंद पाटील,विजय गाढे,संभाजी देवरे,समाधान मैराळे,संजय मरसाळे,सुरेश कांबळे,गुरूनामल बठेजा,सदानंद पाटील,विनोद कदम,सत्तार खान,नूर खान,रोहित बठेजा,युवराज पाटील,अजय भामरे तर वृत्तपत्र वाटप करणारे आदेश जैन,दिपक शिंपी,सुधाकर कुलकर्णी,गणेश पाटील,अशोक पाटील,हरीश मराठे,धनंजय देसले,रोहित पाटील,पूर्वेश पाटील,समीर बागवान,कुणाल पाटील,सोमनाथ बोरसे,जुगल बोरसे,तेजस मुसळे,परेश अमृतकार,सुनील बाळापुरे, जगन्नाथ पाटील,मधुकर बाळापुरे,हेमंत बाळापुरे,चंदू पाटील,वाल्मिक वाणी,श्याम वाणी,एकनाथ महाजन उपस्थित होते
---------------------------------------------------------------------------
             ओम टी पान मसाला च्या 
        नविन दालन (न्युओम स्विटस)          9422296561,9545780258

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines