=======================================
--------------------------------------------------------------------
अमळनेर - देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाचा धोका लक्षात घेऊन शासनाने राज्यात निर्बंध जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील काही दुकानदार वाढीव दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडे येत आहेत. ग्राहकांनी संबंधित दुकानदारांच्या तक्रारी माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबर वर व what's up वर द्याव्यात.संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे आवाहन अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी केले आहे.
No comments
Post a Comment