-------------------------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
आता आपल्या एक फोनवर उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील.
अमळनेर शहरात कुलर विक्री घरपोच सेवा उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------
अमळनेर - सिंधी समाजाचे आराध्य दैवत जय झुलेलाल साई यांची जयंती म्हणजे चेट्री चंड चा उत्सव अमळनेर येथील सिंधी समाज बांधवांनी साधेपणाने साजरा केला. देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असल्याने शासनाने गर्दी जमा करण्यास निर्बंध घातले आहेत.त्यामुळे मंदीरात केवळ पुजा-यांनी पुजाविधी करून चेट्री चंड चा उत्सव करण्यात आला.
दरवर्षी चेट्री चंड चा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. पण यावर्षी निर्माण झालेल्या या संकटामुळे शासनाने मोठ्या कार्यक्रमांवर बंदी घातली होती. त्यामुळे केवळ मंदीरात पुजा विधी करण्यात आला. सिंधी समाज बांधवांनी आपापल्या घरात जय झुलेलाल साई यांच्या प्रतिमेचे प्रथेनुसार पूजन केले. सिंधी कॉलनीतील मंदीर व गुरूद्वारा भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. महिलांनी आरती व पूजे नंतर दीप दान केले व परिवारातील सदस्यांना प्रसाद वाटप करण्यात आला.या जगावर आलेले कोरोना व्हायरसचे संकट दूर होऊन सर्वांना सुखी व समृद्ध जीवन मिळावे अशी प्रार्थना करण्यात आली.
------------------------------------------------------------------------------
आता आपल्या एक फोनवर उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील.



ओम टी पान मसाला च्या नविन दालन