----------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांना वारंवार सूचना देऊनही विनाकारण रस्त्यावर फिरणे,घोळका करून एकत्र उभे रहाणे,वैद्यकीय दृष्टीने आवश्यक नियमांचे पालन न करणे यासारखे प्रकार रोजच घडतांना दिसत आहेत. अद्याप पावेतो प्रशासन समजावून सांगत होते पण आता पोलीसांना कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे. आज शहरात पोलीसांनी गर्दी गोळा करण्यावरून दोन जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र कोविड -१९ उपाययोजना कायद्यान्वये तर विनाकारण फिरणाऱ्या १६ जणांवर पोलिसांनी शासन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे
पोलीस निरीक्षक अंबादास मोरे ,पोलीस नाईक शरद पाटील, सुनील पाटील,योगेश महाजन व आरसीपी प्लाटूनचे कर्मचारी यांनी शहरात फेरफटका मारला असता अग्रवाल उपहार गृहाचे मालक हरीश प्रेमचंद अग्रवाल व अग्रवाल डेअरीचे मालक विशाल राजकुमार अग्रवाल यांनी सूचना देऊनही दुकानांवर गर्दी जमवून खाद्य पदार्थ विक्री केल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ब ,महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना कायदा २०२० चे कलम ११ प्रमाणे तसेच भादंवी कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तसेच संचारबंदी लागू असतानाही विविध ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या जगदीश नाना पाटील वय २५ रा.पैलाड, शनीपेठ,मुख्तार अब्दुल रज्जाक वय ३८ रा. कसाली मोहल्ला , जहीर अली कमर अली वय ३८ रा.गांधलीपुरा,भगवान पोपट पाटील वय ६५ रा.स्टेटबँकेसमोर ,
सुरेश सुकलाल चौधरी वय ४४ रा. बंगाली फाईल,कमलेश हरीश जोशी वय २५ रा.शिरूड नाका, आधार उत्तम पाटील ४८ रा. पळासदळे,रतीलाल जयराम पाटील ६३ रा.पैलाड,राहुल प्रभाकर पाटील वय २२ रामेश्वर खुर्द,लीलाधर पुंडलिक कुंभार वय ४० रा.पैलाड,राहुल गुलाब चौधरी वय ३६ रा.पातोंडा , रायसिंग पांडुरंग पाटील वय ५२ रा. खोकरपाट ,किशोर दिनकर देवरे रा. पातोंडा, शांताराम भालेराव पाटील वय ३१रा. पातोंडा,नाशिर शेख इकबाल वय ३७ रा.जुना पारधीवाडा,समाधान जिजाबराव पाटील वय ३२ रा. संताजीनगर यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंनघन केले म्हणून कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments
Post a Comment