-----------------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
आता आपल्या एक फोनवर उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील.
अमळनेर शहरात कुलर विक्री घरपोच सेवा उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. आरोग्य मंत्र्यांनी रक्तदानाचे आवाहन केले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देत तसेच काळाची पाऊले ओळखत शिवशाही फांऊडेशनच्या वतीने माणूसकीचा वसा जपत उपक्रमशिल शिक्षक पुढे आले. त्यांनी रक्तदान करुन कृतियुक्त सामाजिक संदेश दिला. यावेळी या शिक्षकांनी "मानवतेची कास धरु या..कोरोनाला हद्दपार करु या" असा संकल्पही केला.सध्याच्या स्वार्थी युगात प्रत्येक व्यक्ती हा आपला स्वार्थ साधत असतो अशा या गोष्टींना तिलांजली देत उपक्रमशील शिक्षक तथा शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे, तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक डी.ए.धनगर, आर्मी स्कुलचे प्रा.शरद पाटील, उपक्रमशिल प्राथमिक शिक्षक विशाल देशमुख, आर्मी स्कुलचे गणित शिक्षक गोपाल हडपे, शिवशाही फाऊंडेशनचे सचिव तथा आर्मी स्कुलचे शिक्षक उमेश काटे यांच्यासह स्वप्नील संभाजी पाटील व निखिल विजय बोरसे हे समाजातील गरजूसाठी रक्तही द्यायला तयार झाले.अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे डोस देणारे शिक्षक यांनी कृतीतून रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान आहे हे दाखवून दिले. रक्तदान करणारे शिक्षक ही बदलत्या समाजाची नांदी म्हणावी लागेल. यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, जीवनश्री रक्तपेढीचे संचालक संतोष पाटील, मंडळ अधिकारी व्ही.पी.पाटील ,तलाठी एम.पी. भावसार ,पी.एस.सोनवणे,पी.पी. चव्हाण ,वाल्मिक पाटील उपस्थित होते. यावेळी तहसीलदार वाघ यानी शिवशाही फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. दरम्यान ज्यावेळी देशावर नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती आल्यास शिक्षक हे पुढे येतील. ते आपल्या कृतीतून समाजासमोर व विद्यार्थ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण करतील एवढे मात्र निश्चित.
--------------------------------------------------------------------------------
आता आपल्या एक फोनवर उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील.



