"कोरोना" ला रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या सुचनांची मारवड पोलिसांकडून अंमलबजावणी धार्मिक स्थळांना भेटी देऊन बजावल्या नोटीसा मारवड भाजी बाजारात "सोशल डिस्टन्सींग"चा दिला अनुभव

--------------------------------------------------------------------------
                - * जाहीरात * -
आता आपल्या एक फोनवर  उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील. 
अमळनेर शहरात कुलर विक्री  घरपोच सेवा उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या गावात धार्मिक स्थळांना संचारबंदी व त्या अनुषंगाने येणारे नियम पालन करण्याविषयी सुचना देणा-या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर मारवड येथील भाजी बाजारात नागरिकांनी अंतर ठेवून उभे रहाण्याची सुचना दिल्या. या ठिकाणी पोलीसांनी स्वतःच्या देखरेखीखाली "सोशल डिस्टन्सींग"चा अनुभव जनतेला दिला.
धार्मिक स्थळांना नोटीसा 
   मारवड पोलीस स्टेशन हद्दीतील गावात असलेल्या  मंदीर,मशिद व दर्गा यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक पुजा विधी व मशिदीत नमाज पडण्यास मनाई असल्याने योग्य कार्यवाही करण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार धार येथील मशीदीत घरी नमाज पठण करावे असा फलक लावण्यात आला आहे. 
"सोशल डिस्टन्सींग
          मारवड हद्दीतील आठवडे बाजार येथे भेटी देवुन भाजीपाला व्यावसायिकांना योग्य त्या 
अंतरावर बसवुन ग्राहकांना रांगेत व  सोशल डिस्टन्स ठेवुन भाजीपाला खरेदी-विक्री करण्याच्या सुचना  दिल्या.प्रत्येक ग्रामपंचायतीने भाजीपाला विक्रेत्यांना सुरक्षित अंतरावर एकमेकांपासुन दुर दुकानं लावणे तसेच त्यांचेसमोर ग्राहकांना प्रत्येकी कमीत कमी ३-३ फुट अंतरावर उभे राहुन रांगा लावुन भाजीपाला खरेदी करण्याकरीता मार्किंग करुन देणे आवश्यक आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका टाळुन दैनंदिन गरजा सुरक्षितपणे भागविणे व गर्दी टाळणे शक्य होईल. यासाठी मारवड पोलीस स्टेशनचे कर्मचा-यांनी प्रत्येक गावांना भेटी दिल्या असुन भेटी दरम्यान जिवनावश्यक वस्तु विक्री करतांना दुकानदारांना ग्राहक कसे हाताळावे याच्या समक्ष भेटी घेवुन सुचना दिल्या आहेत.
याकामी स.पो.नि.राहुल फुला यांच्या नेतृत्वाखाली एएसआय संतोष पवार, पो.ना.फिरोज बागवान,पो.ना.सुनिल आगोणे,मुकेश साळुंखे,दिनेश कुलकर्णी,विजय होळकर,भास्कर चव्हाण,सचिन निकम,पो.कॉ.प्रकाश साळुंखे,सुनिल चौधरी,प्रशांत पाटील आदींनी नोटीसा बजावणे व सोशल डिस्टन्सींग योग्य पद्धतीने राबविणे या कामी सहभाग घेतला.
----------------------------------------------------------------------- 
आता आपल्या एक फोनवर  उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील. 
अमळनेर शहरात कुलर विक्री  घरपोच सेवा उपलब्ध आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.