"कोरोना"च्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी बोरी आणि अक्कलपाडा धरणाचे आवर्तन सोडा आमदार अनिल पाटील यांची मागणी

--------------------------------------------------------------------------- 
                    - * जाहीरात * -
आता आपल्या एक फोनवर  उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील. 
अमळनेर शहरात कुलर विक्री  घरपोच सेवा उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात  पाणी टंचाई होऊ नये म्हणून बोरी नदीवरील तामसवाडी व पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरणातुन पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केली आहे. 
           याबाबत आ.पाटील यांनी धुळे जिल्हाधिकारी डी. गंगाधरण यांच्याशी चर्चा केली आहे.सदर चर्चेनुसार जळगाव जिल्हा परिषदने आवर्तन मागणीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती मुख्य कार्यकारीअधिकारी बी.एन.पाटील यांनी दिली आहे. तर जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना बोरी धरणाबाबत देखील मागणी केली असून त्याबाबत लवकर निर्णय होणार आहे अशी माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे. 
            अक्कलपाडा धरणामुळे पांझरा नदी काठावरील अमळनेर तालुक्यातील ४० ते ४५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो त्यासाठी ही मागणी केली असून लवकरच धरणाचे पाणी सोडले जाईल. मागील वर्षी अक्कलपाडा धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर पाणी सोडल्याने फारशी टंचाई जाणवली नाही. आता मात्र मार्च महिन्यात पांझरा नदीपात्र कोरडे झाले असल्याने असंख्य गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवायला लागली आहे. गेल्या ५ वर्षांपासून अक्कलपाडा धरणातून पांझरेत पाणी सोडण्यात येते. त्यामुळे या नदीकाठावरील गावांना विहीर अधिग्रहण अथवा पाणी टंचाईची वणवण होत नाही. अमळनेर तालुक्यातील मांडळ ते नीम व कपिलेश्वर मंदिर या नदी संगमा पर्यंतच्या काठावरील गावांच्या पाणीपुरवठा योजना या नदीवर आहेत. नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली कि पाणी योजनांना घरघर लागते. मग टंचाई सुरु होते. त्यामुळे आवर्तन सोडले कि पाणी टंचाई वरील अनाठायी खर्च कमी होतो. हे लक्षात घेता व सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पाणीटंचाईची झळ पोहचू नये यासाठी मागणी करण्यात आली आहे. 
या गावांना होणार फायदा 
 अमळनेर तालुक्यातील मांडळ, वावडे,जवखेडा,मुडी,बोदर्डे, लोणसीम,लोणचारम,लोण बु॥, लोण खु॥,भरवस,कळंबू,ब्राह्मणे, 
भिलाली,शहापूर,तांदळी,तर धुळे जिल्ह्यातील न्याहळोद,कौठळ, कंचनपूर,तामसवाडी,वालखेडा, अजंदे,बेटावद,पढावद आदी गावांना याचा गावाचा लाभ होणार आहे.
बोरीलाही आवर्तन सुटणार
       पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी बोरी नदीकाठावरील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमदार अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.बी.बेहरे यांच्याकडे चर्चा केली. त्यानुसार चर्चा होऊन एप्रिल महिन्यात बोरी नदीत पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी आमदार पाटील यांना दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाणी पिण्यासाठी उपयोगात येईल नदीकाठावरील गावांची पिण्याची पाण्याची समस्या सुटणार आहे.यात शिरसोदे,बहादरपूर,भिलाली,अंबापिंप्री,कोळपिंप्री, फापोरे, कन्हेरे, हिंगोणे बहादरवाडी, अमळनेर व पुढील गावांना होणार असून हे पाणी सोडल्यानंतर याठिकाणी मंगरूळसह १० गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी असल्याने त्या योजना जिवंत होतील व शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल.
---------------------------------------------------------------------------
आता आपल्या एक फोनवर  उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील. 
अमळनेर शहरात कुलर विक्री  घरपोच सेवा उपलब्ध आहे.
ओम टी पान मसाला च्या नविन दालन

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.