लॉकडाऊनमुळे पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी मदतीचे विशेष पॅकेज मिळावे वृत्तांकन करतांना पत्रकारांना पोलीसांकडून मारहाण व अडवणूक होऊ नये महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र


------------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
आता आपल्या एक फोनवर  उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील. 
अमळनेर शहरात कुलर विक्री  घरपोच सेवा उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------
अमळनेर - राज्यात कोरोना सारख्या महाविषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने लॉक डाऊनचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने वेगवेगळ्या समाज घटकांसाठी विविधयोजना घोषित केल्या आहेत.पत्रकारांना देखील शासनाने आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करावे. तसेच लॉक डाऊनच्या काळात वृत्तांकन करणा-या पत्रकारांना पोलिसांकडून मारहाण व अडवणूकीचे प्रकार घडत आहेत. असे प्रकार घडू नयेत याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य ईश्वर महाजन यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवले आहे. 
        आपल्या पत्रात पत्रकारांच्या वतीने भुमिका मांडतांना श्री ईश्वर  महाजन यांनी लिहीले आहे की, राज्यशासनाने घेतलेल्या लॉकडाऊनच्या स्तुत्य निर्णयाबद्दल शासनाचे अभिनंदन. 
 कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरिक करीत आहेत.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनता कर्फ्यू व लॉकडाऊनसारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले असून अाम्हीआपल्यानिर्णयाचे स्वागत करीत आहोत.पोलीस,डॉक्टर, प्रशासकीय यंत्रणेबरोबर पत्रकार,प्रेस फोटोग्राफर बांधवही आपल्या जिवाची पर्वा न करता जनजागृती करीत आहेत.हे काम करीत असताना काही ठिकाणी पत्रकार बंधूंनाही पोलीसांनी मारहाण केली.तेंव्हा ओळखपत्र असणा-या पत्रकारांना पोलीसांनी
 मारहाण अथवा अडवणूक करु नये अशी आमची मागणी आहे. तसेच अनेक पत्रकारांना निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे खुप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.तेंव्हा पत्रकार मग तो प्रिंट मिडीयाचा असो किंवा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा असो या सर्वांचा गांभीर्याने विचार करून अन्य घटकांप्रमाने त्यांना आर्थिक मदतीचे पँकेज द्यावे तसेच या कालावधीत पत्रकारांच्या वाहनांना पेट्रोल/डिझेलचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी,तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांनी आज केली.दि. २९ मार्च २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना या मागणीचे पत्र मेलद्वारा महाराष्ट्र पत्रकार संघ अमळनेर शाखेच्या वतीने राज्यकार्यकारणी सदस्य ईश्वर महाजन यांनी पाठविले आहे.
----------------------------------------------------------------------- 
आता आपल्या एक फोनवर  उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील. 
अमळनेर शहरात कुलर विक्री  घरपोच सेवा उपलब्ध आहे.
ओम टी पान मसाला च्या नविन दालन


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.