जळगाव येथे कोरोनाचा एक रूग्ण आढळला नागरिकांनी आता तरी नियमांचे पालन करावे-प्रशासनाचे आवाहन

---------------------------------------------------------------------------
                 - * जाहीरात * -
आता आपल्या एक फोनवर  उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील. 
अमळनेर शहरात कुलर विक्री  घरपोच सेवा उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------
अमळनेर - आजपर्यंत आपल्या जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण आढळून आला नव्हता. त्यामुळे केवळ प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहे असे नागरिकांना वाटत होते. पण आज सायंकाळी जळगाव येथे एक बाधित रूग्ण आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शासनाने संचारबंदी लागू केली आहे तरीही नागरिक नियमांचे गांभीर्य लक्षात घेऊन वागत नसल्याचे दिसून येत होते.पण आता परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचे दिसून येत आहे. आता तरी नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 
                कोरोना व्हायरसच्या संसर्गाची तीव्रता आता प्रसार माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहे.शासनाने ज्या जलद गतीने उपाय योजना केल्या त्यावरून हे भयानक संकट असल्याची जाणीव सर्वांना होऊ लागली आहे. अमळनेर तालुक्यात आतापावेतो ६१५९ नागरिकांची माहिती घेऊन प्रशासनाने त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यात कॉरेन्टाईनचा शिक्का ज्यांच्या हातावर मारला आहे त्यांना तर घराबाहेर न जाण्याचा आदेश दिला आहे. तरीही काही नागरिक हा आदेश अक्षरशः धुडकावून बाहेर फिरत असल्याचे दिसून येत आहे. अशी व्यक्ती आढळून आल्यास प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे,तहसिलदार मिलिंद वाघ,गटविकास अधिकारी संदीप वायाळ,मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांनी केले आहे. अशा रूग्णांची व्यवस्था नियंत्रीत व एकाच ठिकाणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काही रूग्ण याठिकाणी उपचार घेत आहेत. 
लोकप्रतिनिधी सक्रीय
     "कोरोना" ला रोखण्यासाठी प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधीही सक्रीय झाले आहेत. आ.अनिल पाटील यांच्या सहकार्याने शहरातील एम.डी.डॉक्टर्स एकत्र येऊन एकाच ठिकाणी रूग्ण तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तर आ.स्मिता ताई वाघ व मा.आ.शिरीष चौधरी यांनी अधिकारी वर्गासोबत स्वतंत्रपणे  चर्चा करून उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मा.आ.शिरीष दादा चौधरी यांनी आपले निवासस्थान कॉरेन्टाईन रूग्णांच्या आयसोलेशन वॉर्डसाठी देण्याचे सुचित केले आहे.तर नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील,मा.आ.साहेबराव पाटील यांनी नपाच्या माध्यमातून विविध उपायांची या आधीच  अंमलबजावणी सुरू केली आहे. 
नियमांचे गांभीर्य कधी ?
             या नवीन उद्भवलेल्या आजाराबाबत तज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या सुचनांचे आपण पालन करावे याचे गांभीर्यच काही जणांना दिसत नाही. घराबाहेर निघू नका असे सांगितलेले असतांनाही काहीही महत्वाचे काम नसतांना विनाकारण रस्त्यावर फिरणारे सुशिक्षित नागरिक,तरूण पोलीस व प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहेत. आता तरी गांभीर्य ओळखून नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------------------------------------------------------------------
आता आपल्या एक फोनवर  उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील. 
अमळनेर शहरात कुलर विक्री  घरपोच सेवा उपलब्ध आहे.
ओम टी पान मसाला च्या नविन दालन

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.