आमदार अनिल पाटील यांच्या सहकार्याने तपासणी कॅम्प सुरू सर्दी-ताप-खोकल्याचे १५० रुग्णांची आज तपासणी

----------------------------------------------------------------------
                - * जाहीरात * -
आता आपल्या एक फोनवर  उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील.अमळनेर शहरात कुलर विक्री  घरपोच सेवा उपलब्ध आहे.
--------------------------------------------------------------------------
अमळनेर - राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगाने पसरत असून त्यावर निर्बंध घालता यावा यासाठी अमळनेर येथे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अभिनव प्रयोग राबवून शहर व तालुक्यातील सर्व सर्दी, ताप रुग्णांना एकाच ठिकाणी वळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विषाणूंचा इतरत्र संसर्ग न होता लवकर नियंत्रण मिळवता येणे शक्य होणार आहे.बाहेर गावाहून आलेले तसेच सर्दी व तापाच्या रुग्णांना तपासण्याची यंत्रणा अपूर्ण पडत असल्याने संशयित रुग्ण देखील आढळून येत नव्हते. त्यावर उपाय म्हणून आमदारांनी शासकीय अधिकाऱी व तज्ञ डॉक्टरांची बैठक घेऊन  संकल्पना मांडली. त्यानुसार लागलीच अमंलबजावणी सुरू केली. शुक्रवारपासून साने गुरुजी शाळेत तज्ञ डॉक्टरांकडून दररोज सकाळी १० ते १ या काळात तपासणी सुरू केल्याने रुग्णांचे विलगीकरण करणे सोपे होत आहे.
              त्याआधी सकाळी साने
गुरुजी शाळा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने औषध फवारणी करून पूर्ण निर्जंतुक केली. स्वतः आमदार अनिल पाटील देखील फवारणी करत होते.त्यांनतर एक बालकांचा व एक प्रौढांचा कक्ष तयार करण्यात आला.बालरोग तज्ञ डॉ.नितीन पाटील,डॉ.जी.एम.पाटील,एम.डीडॉ.अविनाश जोशी,डॉ.किरण बडगुजर,डॉ.संदीप जोशी,
डॉ.राजेंद्र शेलकर,डॉ. प्रशांत शिंदे आदींनी रुग्णांची तपासणी सुरू केली. 

        तालुक्यातील सर्दी,खोकला,तापाचे रुग्ण एकाच ठिकाणी वळवण्यात आल्याने इतरत्र संसर्ग न वाढता लवकर नियंत्रण मिळवता येणार आहे. तसेच संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात येणार आहे.यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, विक्रांत पाटील,एल.टी.पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे , तहसीलदार मिलिंद वाघ ,नपाच्या  मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड ,संजय चौधरी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी ,डॉ विलास महाजन , पालिका कर्मचारी महेश जोशी, भालचंद्र जगताप, कीर्ती गाजरे ,मीरा देवरे हजर होते.बाहेरून 
आलेल्या व स्थानिक रुग्णांची येथे तपासणी मोफत करण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व सरकारी  व खाजगी दवाखान्यातील सर्व डॉक्टरांनी सर्दी ताप खोकल्याचे सर्व रुग्ण याठिकाणी पाठवावेत जेणेकरून कोरोना आहे किंवा नाही याची खात्री होईल व सर्व तालुक्यातील रुग्णांची एका ठिकाणी माहिती जमा होईल. संशयित रुग्ण सापडल्यास भविष्यातील कोरोनाला अटकाव करता येईल.शुक्रवारी ७५ जणांची तर आज शनिवारी एकूण १५० रूग्णांची तपासणी करण्यात आली.
---------------------------------------------------------------------------
आता आपल्या एक फोनवर  उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील. 
अमळनेर शहरात कुलर विक्री  घरपोच सेवा उपलब्ध आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.