नवनियुक्त मुख्याधिकारी डाॅ.विद्या गायकवाड यांचा न.पा.कामगार संघटनांतर्फे स्वागत समारोह

अमळनेर -
येथील नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी नव्यानेच बदलून आलेल्या डाॅ.विद्या गायकवाड यांचा आज डाॅ.आंबेडकर कर्मचारी सहकारी  पतसंस्थेच्या सभागृहात स्वागत सत्कार सोहळा नुकताच पार पडला.यावेळी सर्व कामगार-कर्मचारी संघटना व डाॅ.आंबेडकर सामाजिक परीषदेतर्फे शाल-साडी,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील,लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कामगार नेते रामभाऊ संदानशिव,अॅड.शकील काझी,प्रा.डाॅ.विजय तुंटे, प्रा.डॉ.हर्षवर्धन जाधव,प्रा.गुलाले,पतसंस्था चेअरमन संजय बिर्‍हाडे,इंटक तर्फे सोमचंद संदानशिव यांचे हस्ते देखील पुष्पगुच्छ व भगवान गौतम बुध्दाची मुर्ती देऊन भव्य स्वागत करण्यात आले.या सत्कार प्रसंगी नगरसेवक मनोज पाटील,हाजी शेखा मिस्तरी,फयाजखाॅ पठाण,
विक्रांत पाटील,व कार्यकर्ते धर्मा ब्राह्मणे, एस.आर.होलार,इंजि.भामरे,इंजि.हर्षल 
सोनवणे आदीसह सुमारे २०० कर्मचारी उपस्थीत होते. यावेळी प्रा.डॉ.तुंटे,अॅड. शकील काझी,रामभाऊ संदानशिव व कृषीभुषण साहेबराव पाटील यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व परिचय संजय चौधरी यांनी करुन दिला.
-----------------------------------------------------------------------------------
ओम टी पान मसाला च्या नविन दालन

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.