----------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
अमळनेर - लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अमळनेरचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व त्यांच्या समवेत असलेले पोलीस कर्मचारी
वाडी संस्थान येथून दर्शन आटोपून दगडी दरवाजाकडे जात असतांना रस्त्यावर अगदी गरीब परिस्थिती असलेले लहान मुले, मुली,स्रीया जात होते.पोलीस गाडी पाहुन ते घाबरले व पळायला लागले. परंतु त्यांना थांबवून साहेबांनी गाडीतील गोडशेव,चिवडा असे पाकीट सगळ्यांना दिले यातुन कर्तव्य दक्ष मोरे साहेबांनी माणूसकीचे दर्शन घडविले. मनोज माळी यांनी हे दृश्य पाहुन आपल्या मोबाइलमध्ये ते दृश्य टिपले.त्यांनी हे फोटो सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे व भरत यांना पाठवले व त्यांना ही माहीती दिली.अहोरात्र बंदोबस्त ठेऊन कोरोनाच्या महासंकटाशी झुंज देणारे अमळनेरचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व प्रशासनाचे या संवेदनशील कृतीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी मधूकर पाटील,संजय पाटील, बागूल आदी पोलीस बांधव सोबत उपस्थित होते.




