साईबाबा पुण्यतिथी महोत्सव समितीची अनोखी बांधिलकी २४ वर्षांची परंपरा अखंडित ठेवत केले अन्नदान

----------------------------------------------------------------------------
अमळनेर -
येथील वाघ बिल्डींग परिसरातील अमळनेर शहरात सर्वांत पुरातन असलेल्या श्री साईबाबा मंदिराच्या महोत्सव समितीतर्फे गेल्या २४ वर्षांपासुन श्रीराम नवमी निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते.यावेळी हजारो भक्त महाप्रसादाचा आस्वाद घेत असतात.परंतु ह्या वर्षी कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने लाॅकडाऊन सुरु आहे.मग यावेळी नियमांचे पालन म्हणुन हा कार्यक्रम रद्द करावा लागला.परंतु ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सफल व्हावा व ह्या लाॅकडाऊन मुळे उपाशी असलेल्या गरजु कुटुंबियांना महाप्रसादाचे वाटप करुन आपली परंपरा अखंडित ठेवली पाहिजे असा विचार मंडळाचे खजिनदार अनिल महाजन,सदस्य सचिनआमोदकर,उमेश ठाकुर,प्रविण ठाकुर यांच्या मनात आला व ह्या निर्णयाला होकार म्हणुन मंडळातील युवा सदस्यांनी पुढाकार घेत तीनशे लोकांना पुरेल एवढा खिचडी व प्रसाद तयार करुन ढेकु रोडवरील आदिवासी वस्ती व कोर्टाच्या मागील बाजूस असणा-या गरजू कुटुंबांना त्याचे वाटप करत ख-या अर्थाने शासनाच्या नियमांचेपालन करुन आपला उत्सव अखंडित ठेवत एक आदर्श निर्माण केला.
 अमोल माळी यांच्या हस्ते श्री साईंची आरती संपन्न झाली.यावेळी जयंत महाजन,अमोल सोनवणे,सागर पाटील,भुषण ठाकुर,राहुल ठाकुर,भुषण महाजन,मंगेश पाटील,विवेक पाटील,शुभम बागुल,भुपेश ठाकुर,सुरज शिंपी,जिगर पाटील, उदय पाटील,मनोहर मराठे, दिपक सोनवणे,दिनेश कोळी, नितीन ठाकुर,तुषार, प्रितेश चौधरी,सागर महाजन ह्या युवा सदस्यांचे सहकार्य लाभले.
-----------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.