-------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------
अमळनेर - शहरातील प्रभाग क्रमांक १६ व १७ मधील नागरिकांना पंतप्रधान कल्याण योजनेंतर्गत धान्याचे वितरण आज दिनांक १५ एप्रिल रोजी उपनगराध्यक्ष विनोद (बिजू नाना) यांच्या सहकार्य,मार्गदर्शनाखाली वितरीत करण्यात आले. यावेळी शासकीय निर्देशांचे पालन करण्यात आले. किती लाभार्थ्यांना मिळाला लाभ
शहरातील प्रभाग क्र.१६ व १७ मधील साने गुरुजी वि.का सेवा सह. सोसा. लि. अमळनेर
यांच्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान नं.१ व नं.२ मधील अनुक्रमे ४३६ पैकी ३२३ व ३१८ पैकी २१७ लाभार्थ्यांना धान्य वाटप झाले.

आदेशांचे पालन
पंतप्रधान कल्याण योजने अंतर्गत प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत वाटप करतांना "कोवीड-१९" कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भाव वाढू नये म्हणून या परिसरात सॅनिटायझर फवारणी करून व दोन मीटरचे अंतर ठेवण्याबाबत प्रत्यक्ष स्वतः उभे राहून नगरपरिषदेचे लाडके उपनगराध्यक्ष नानासो. विनोद रामचंद्र लांबोळे उर्फ बिजूनाना यांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली व तांदुळ वाटप करण्यास सहकार्य केले.

यावेळी न.पा.चे लिपीक चंद्रकांत रामदास शिंगाणे व शिपाई ईश्वर संतोष पाटील, प्रकाश भास्कर महाजन, बापू झुलाल पाटील,नितीन भदाणे,बापू महाजन,बापू शिंगाणे, राजु भाऊ महाजन,साखरलाल महाजन,सुभाष भोई, जगदिश महाजन,निलेश भोई,निलेश सुतार,संभा महाजन आदी उपस्थित होते. दुकान नं १ चे चालक श्री.शामराव महादु महाजन व दुकान नं. २ चे चालक श्री मोतीलाल भिका महाजन यांनी बी.पी.एल.अंत्योदय,प्राधान्य कुटुंब या कार्डधारकांना आज तांदुळ वाटप केला.
No comments
Post a Comment