"कोरोना"च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी निर्जंतुकीकरण प्रवेशद्वाराची निर्मिती पंकज चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराचा सामाजिक उपक्रम खा.उन्मेश पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले लोकार्पण

Wednesday, April 15, 2020

/ by Amalner Headlines
------------------------------------------------------------------------
                    - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------------
अमळनेर - 
येथील राजे संभाजी मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, पंकजभाऊ चौधरी मित्र परिवाराच्या वतीने कोरोना महाभयंकर आजाराला प्रतिबंध करण्याचा हेतूने मा.जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज पंडीत चौधरी यांच्या दि.१४  एप्रिल रोजीच्या वाढदिवसा निमित्त बाहेरपुरा भागात येणाऱ्या नागरिकांना निर्जंतुकीकरण करून परिसरात प्रवेश करण्यासाठी राजे संभाजी मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ च्या युवा कार्यकर्त्यांनी निर्जंतुकीकरण प्रवेशद्वाराची निर्मिती केली आहे.
     सदर प्रवेशद्वाराचे उदघाटन जळगांव लोकसभा मतदार संघाचे खासदार  उन्मेषदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी तहसिलदार  मिलींद वाघ,बीडीओ संदीप वायाळ,नपाचे उपमुख्याधिकारी  संदीप गायकवाड,पारोळा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करणदादा पाटील, न.पा.चे संजय सुदाम चौधरी, आरोग्य निरिक्षक चव्हाण,प्रभागाच्या नगरसेविका सौ.कल्पना चौधरी ,अर्बन बँकेचे संचालक पंडितनांना चौधरी, नगरसेवक बाळासाहेब संदानशिव आदी मान्यवर उपस्थित होते.
मंडळाचे सदस्य राजेंद्र देसले, विजय चौधरी,पराग चौधरी, ब्रिजलाल पाटील,राकेश चौधरी, गौरव चौधरी,शंकर देसले,हरिश्चंद्र पाटील,विष्णू पाटील,रवींद्रसाळी, किरणभाईजी,अल्ताप बागवान,असलम बागवान, मोहसीन पठाण,हितेश देसले, चेतन चौधरी,भूषण अहिरराव, रुणाल पाटील,चेतन पाटील,महेश वाणी, संजय बाविस्कर, जितेश भार्गव , रोहित मकवाना व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

परिसरात येणारे प्रत्येक नागरीक ह्या प्रवेशद्वारातुनच प्रवेश करून आल्याने तो निर्जंतुक होऊन आल्याने परिसराला संभाव्य आजारा पासून अधिकाधिक बचाव करता येईल ह्या स्तुती पात्र कार्य करणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन खासदार श्री उन्मेष पाटील ,करण पाटील, यांनी केले व तहसीलदार श्री वाघ  यांनी सोशल डिस्टनसिंग बाबत कार्यकर्ते घेत असलेल्या काळजी चे कौतुक केले.नगरपरिषदेतर्फे घेत असलेल्या खबरदारी बाबत श्री गायकवाड,आरोग्य निरीक्षक श्री चव्हाण यांचे आभार नागरिकांनी ह्या वेळेस मानले.
--------------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines