माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या वतीने शहरात स्वखर्चाने निर्जंतुकीकरण मोहीम अत्याधुनिक २ निर्जंतुकीकरण मशीन, करून दिले उपलब्ध

-----------------------------------------------------------------------
                 - * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------------
अमळनेर -
शहरात सध्या कोविड १९ चे थैमान सुरू आहे. या भयावह परिस्थितीत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या वतीने शहरात २ अत्याधुनिक मशिनच्या सहाय्याने फवारणी करण्यात येत आहे.
      कोरोना आजाराच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरवासीयांमध्ये 
भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात प्रताप महाविद्यालय येथे कोविड केअर हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण रुग्णालय येथे बाधित रूग्णांवर डॉक्टर्स बांधव तातडीने  उपचार करीत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे .या  काळात नागरिक व प्रशासन यांच्यात समन्वय साधणे महत्वाचे आहे. प्रशासनाचे व नागरिकांचे मनोबल वाढवण्याचं काम आपणा सर्वांचे आहे. कॅन्टोन्मेंट झोन मधील नागरिकांनी व मित्र परिवार आघाडीच्या नगरसेवकांनी निर्जंतुकिकरण फवारणीची आवश्यकता असल्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने मा.आ.शिरीष चौधरी यांनी  प्रशासनाला विचलीत न करता आज स्वखर्चाने शहरासाठी २ अत्याधुनिक निर्जंतुकिकरण फवारणी यंत्र व रसायन उपलब्ध करून दिले आहे.
जिथे कमी तिथे आम्ही या भुमिकेत काम करणार - मा.आ.शिरीषदादा चौधरी
          या कोरोनाच्या युध्दात आरोग्य विभागाचे डॉक्टर्स,नगरपालिकेचे सर्व कर्मचारी ,पोलीस व कोरोना वॉरीयर्स घेत असलेल्या मेहनतीचे मी कौतुक करतो आणि जनतेच्या वतीने त्याचा ऋणात राहु इच्छितो, "जिथे कमी तिथे आम्ही" ह्या उक्तीप्रमाणे आम्ही या पुढेही वाटचाल करणार असून अश्या गंभीर परिस्थितीचे भान ठेवून फक्त राजकारण न करता जनतेची सेवा करण्याची आमची भूमिका असून ती सेवा अहोरात्र करुन कोरोनाला अमळनेरमधून "कोरोना योद्धा" च्या मदतीने हद्दपार करू अशी आशा व्यक्त करत नागरिकांनी घाबरून न जाता जागृत राहून कोरोनाच्या विरोधातली ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे हा विश्वास व्यक्त करता नागरिकांना संयम , सतर्क राहण्याचा तसेच काहीही अड़चण आल्यास माझ्या कार्यालयात संपर्क करा असे आवाहन मा.आ. शिरीषदादा चौधरी यांनी केले. यावेळी   प्रांताधिकारी सीमा अहीरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे ,न.पा. प्रशासन अधिकारी संजय चौधरी,गटनेते प्रविण पाठक,नरेंद्र चौधरी, 
पंकज चौधरी ,योगराज सदांनशिव,सुनिल भामरे,अबु महाजन,किरण गोसावी,किरण पाटील,संतोष पाटील,संतोष लोहेरे,राजु चौधरी, दिनेश चौधरी उपस्थित होते
-----------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.