जळगाव जिल्ह्यात कोरोना शंभरीपार - आज आढळले २४ बाधित रूग्ण अमळनेरात आज २१ बाधित रूग्ण आढळले तर ५१ अहवाल निगेटिव


------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------
अमळनेर -
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व पाचोरा येथे स्वॅब घेतलेल्या ७८ कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल रात्री प्राप्त झाले होते.  यापैकी ६८ व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून १० व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर रात्री उशिरा १४ रूग्णांचे अहवाल  पॉझिटीव्ह आल्याने जिल्ह्यातील रूग्ण संख्येने शंभरी पार केली आहे.  
                   आज पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोरा येथील आंबेडकर नगर मधील २१ वर्षीय तरूण,गिरड रोड येथील ४९ वर्षीय पुरूष, अंतुर्ली येथील ५० वर्षीय पुरूष अशा तीन तर अमळनेर येथील शाहआलम नगर,माळीवाडा,अमलेश्वर नगर,इस्लाम पूरा या भागातील एकूण २१ व्यक्तींचा समावेश आहे. 
              निगेटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोरा येथील १६, भडगाव येथील एक व अमळनेर येथील ५१ व्यक्तींचा समावेश आहे. अजूनही काही स्वॅब घेतलेले असून त्यांचा अहवालही लवकरच प्राप्त होईल.अमळनेर येथील रूग्ण संख्या आता ६७ झाली आहे. यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अमळनेर येथे ५ दिवस जनता कर्फ्यु घोषित करण्यात आला आहे. काल जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. तरीही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरतांना आढळून आले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
           जिल्ह्यांत बाधित रूग्णांची संख्या ११४ झाली आहे. त्यापैकी १४ रूग्ण मयत झाले असून १ कोरोना मुक्त झाला आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
---------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.