अमळनेरच्या सुविधायुक्त कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत १४ रूग्ण कोरोनामुक्त

----------------------------------------------------------------------------
           - * जाहीरात * -
----------------------------------------------------------------------------
अमळनेर - 
तालुक्यातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध उपाय योजना करत आहे. सलग ८ दिवस जनता कर्फ्यु पाळण्यात आल्याने आजाराचे रूग्ण वाढण्याची गती कमी झाली आहे. एका अर्थाने कोरोनाची चेन ब्रेक करण्यात अमळनेर यशस्वी ठरले आहे. त्याचप्रमाणे उपचार घेत असलेले रूग्ण उपचाराअंती घेतलेल्या चाचणीत निगेटीव्ह आढळून आल्याने कोरोना मुक्त झाले आहेत. या रूग्णांना व तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेल्या संशयित रूग्णांना कोविड केअर हॉस्पिटल मधुन सोडण्यात आले.  
              आमदार अनिल पाटील यांनी क्वॉरेंटाईन नोटीस देत रुग्ण घरपोच रवाना केले असुन आता त्यांना होम क्वॉरेंटाईन करण्यात आले आहे.यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, कोव्हीड केअरचे मानद वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप जोशी, नगरपालिका उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे,डॉ.आशिष पाटील,गिरीष शिंदे,डॉ.टी.आर. फडके,डॉ.आरती नेरपवार,डॉ. भाविका पाटील,डॉ.अक्षय न्हाळदे,डॉ. तुषार बडगुजर, डॉ. विकास मोरे,परिचारिका एल. व्ही.चौधरी यांच्यासह इतर परिचारिका,आरोग्य कर्मचारी सफाई कामगार यांच्यासह पोलीस कर्मचारी व विविध कर्मचारी एसटी बस चालक सचिन पाटील, सुनील देवरे यांनी यांनी अहोरात्र काम करून रुग्णांचे समुपदेशन केले.
दोन बालकांचा समावेश
                यात दोन बालक, एक बालिका यांच्यासह तरुणी,मध्यम वर्गीय महिला पुरुष कोरोनामुक्त होऊन घरी परतले.यावेळी सर्व रुग्ण आनंदात होते. विजयी हास्यमुद्रा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. या १४ जणांनी आज सुटकेचा श्वास सोडला आहे. यापूर्वी ४ रुग्ण घरी सोडण्यात आले होते.
--------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.