कोरोना पासून बचावासाठी आर्सेनिक अल्बम-३० सीएच गोळयांचे वाटप छत्तीसगड मधील ५७ मजुर राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवले

अमळनेर -
कोरोना आजारापासून बचाव होण्यासाठी शहरात कॅन्टोनमेंट झोन मधील नागरिक व शासकीय कर्मचारी यांना आर्सेनिक अल्बम-३० सीएच गोळयांचे वाटप करण्यात आले. 
      अमळनेर शहरातील कॅन्टोनमेंट झोन मधील नागरिक, उपविभागीय अधिकारीकार्यालय, तहसिल कार्यालय, एस.टी. महामंडळ,आरोग्य विभाग,सफाई पाणीपुरवठा कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स, शिक्षक, पोलीस पाटील, सरपंच,शासकीय धान्य गोडाऊन कर्मचारी वहमाल, दुकानदार, पंचायत समिती, पोलीस स्टेशन,भाजीपाला विक्रेते,दुध विक्रेते या घटकांपर्यंत एकूण ४६९७ इतक्या आर्सेनिक अल्बम-३० सीएच गोळयांच्या डब्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार मिलिंद वाघ यांनी दिली आहे.  
परप्रांतीय मजूर रवाना
             अमळनेर येथे अडकून पडलेल्या छत्तीसगड येथील ५७ मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसेसद्वारे रवाना करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.