रूग्ण असलेला छोटा भाग वगळता ऊर्वरित शहरातील व्यवसाय उद्यापासून सुरू होणार आ. अनिल पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

--------------------------------------------------------------------------- 
            - * जाहीरात * -
----------------------------------------------------------------------------
अमळनेर -
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या पावणे दोन महिन्यांपासून बंद असलेले तालुक्यातील व्यवसाय उद्यापासून (दि.२३) सुरू करता येणार आहेत. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या ४ थ्या भागात त्या-त्या भागातील परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात यावा असे निर्देश राज्यांना दिले आहेत. त्या अनुषंगाने अमळनेर तालुक्यातील रूग्ण संख्या कमी झाल्याने काही नियमांमध्ये सवलत देण्यात देता येऊ शकते. त्याआधारे आमदार अनिल पाटील यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी चर्चा केली असून आजपासून अमळनेर खुले होणार आहे. फक्त अमळनेर शहरातील पॉझिटीव्ह रूग्णाचा छोटा एरिया वगळता इतर सर्व शहर खुले होणार आहे.
नागरिकांना आर्थिक झळ
            गेल्या दीड-पावणे दोन  महिन्यांपासून ज्यांचा कोरोनाशी संबंध नाही अशा नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपासमार सुरू झाली आहे. मध्यमवर्गीय नागरिक तर आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणावर  आर्थिक झळ सोसावी लागत आहे. जीवनाश्यक वस्तूंपासून नागरिक व व्यावसायिक उपेक्षित आहेत ही सर्व परिस्थिती पाहता व शहरातील कोरोना रूग्णांची कमी होणारी संख्या व सुधारत असलेली परिस्थिती पाहता शहरात आता केवळ एक पॉझिटिव्ह रुग्ण असून त्याच्या कुटुंबातील १२ सदस्य कोव्हीड सेंटरला ठेवण्यात आलेले आहेत.   आता शासनाने इतर झोन वगळून केवळ रेड व नॉन रेड झोन असे दोनच भाग केले आहेत. शहरातील रूग्ण संख्येचा दोन-तीन किलोमीटर एरिया एकाच भागात असून त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 
आमदारांच्या प्रयत्नांना यश
           या सर्व गंभीर परिस्थिती बाबत आमदार अनिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले व येथील परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर मुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागणीस हिरवा कंदील दाखवला असून त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली व स्थानिक अधिकार्‍यांशी देखील त्याबाबत चर्चा केली असून त्यांची लवकरच बैठक होणार आहे.
 व्यावसायिकांची होत असलेली उपासमार,ठप्प झालेले व्यवहार पाहता केवळ रेड झोन असलेला छोटा एरीया प्रतिबंधित क्षेत्र म्हणून करण्यात येणार असून इतर सर्व भाग नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. त्याच बरोबर नागरिकांनी एका ठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टन्स पाळावे अन्यथा त्यांच्यावर आणि वितरकांवर गंभीर कायदेशीर  कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर याचा वापर करावा. ग्राहक व विक्रेते यांनी स्वतःही सुरक्षित रहावे अशी माझी आपणास सूचना आहे.
*-आमदार अनिल पाटील,*
सर्व व्यवसाय होणार खुले
         शहरातील सर्व किरकोळ व्यावसायिक यांची मोठ्या प्रमाणावर गळचेपी सुरू झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती हे  सर्व पाहता आमदार अनिल पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.
-----------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.