भाजीपाला विक्रेते व नगरसेविका पतीची नपा कर्मचा-यांशी अरेरावी आज कर्मचारी काळया फिती लावणार,संबंधितांवर कारवाई न झाल्यास असहकार्य आंदोलन

---------------------------------------------------------------------------
           - * जाहीरात * -
------------------------------------------------------------------------
अमळनेर -
तालुक्यात जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले असतांना शहरातील काही चौकात भाजीपाला विक्री होत  असल्याचे आढळून आल्याने नगर परिषदेच्या कर्मचा-यांनी लोटगाडी,भाजीपाला व विक्री साहित्य जप्तीची कारवाई केली. त्यावरून नपा कर्मचारी व विक्रेते यांच्यात शाब्दिक वाद झाला. भाजीपाला विक्रेते व नगरसेविका पती व मुलगा यांनी कारवाईत अडथळा निर्माण केला. यानंतर नपा जाणीवपूर्वक पक्षपाती कारवाई करीत असल्याचा आरोप भाजीपाला विक्रेते व एका नगरसेविकेच्या पतीने केला. तर नगर सेविकेच्या पतीने अरेरावीची भाषा वापरली असल्याचे कर्मचा-यांनी सांगितले.बेकायदेशीरपणे भाजीपाला विक्री करून शासकीय कामात अडथळा आणणे, कर्मचारी वर्गास अरेरावी करणे याबाबत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.  
आज काळया फिती लावणार
     नगर परिषदेच्या कर्मचारी वर्गाशी अरेरावी करणारे भाजीपाला विक्रेते, सदर नगरसेविकेचा पती,मुलगा यांचेवर कारवाई करावी या मागणीसाठी उद्या नपा कर्मचारी काळया फिती लावून निषेध व्यक्त करणार आहेत.
  
कारवाई न झाल्यास २६ पासून असहकार्य आंदोलन
     प्रशासनाने संबंधितांवर कठोर पोलीस कारवाई न केल्यास सर्व कर्मचारी दि. २६ मे.पासून असहकार्य आंदोलन करतील याची शासनाने गंभीर दखल घ्यावी असे राष्ट्रीय न.पा.मजदूर महासंघाचे जनरल सेक्रेटरी रामभाऊ संदानशिव यांनी म्हटले आहे.
------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.