----------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------
अमळनेर - संपूर्ण देशात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून दि.२४ मार्च २०२० पासून सातत्याने सुरू असलेल्या लाॅकडाऊनची मुदत दि. ३१ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अंग मेहनतीचे श्रम करत आपली उपजिविका भागविणा-या मुस्लिम कुटूंबियांसाठी रमजान ईद या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छांसह २५० कुटूंबांना ७५ हजार रुपयाची आर्थिक मदत मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी दिली आहे. त्याबद्दल अॅड.सलीम शेख, नगरसेवक शेखा हाजी, फयाजदादा पठाण,मुख्तार खाटीक,इम्राण खाटीक,शफी मास्तर आदींनी माजी आमदार कृषीभुषण साहेबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.
No comments
Post a Comment