आज चंद्रदर्शन न झाल्याने ईद सोमवारी साजरी होणार घरीच नमाज अदा करण्याचे रुहिते हिलाल व ईदगाह ट्रस्टचे आवाहन अमळनेर पोलीसांनीही घेतली मुस्लीम बांधवांची बैठक

----------------------------------------------------------------------
             - * जाहीरात * -
--------------------------------------------------------------------------
जळगाव / अमळनेर -
जळगाव येथील रूहते हिलाल कमिटीची सभा आज ईदगाहच्या सभागृहात शहर काजी मुफ्ती अतीकुर्रहमान 
यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यात जळगावात अथवा इतरत्र कोठेही आज चंद्रदर्शन न झाल्याने ईदची नमाज सोमवारी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
        रमजानचा आज शनिवारी एकोणतिसावा रोजा असल्याने रविवारची ईद होईल का म्हणून पाहणी करण्यात आली म्हणून रूहते हिलाल कमिटीची सभा घेण्यात आली. सर्व प्रथम इदगाह ट्रस्टचे सचिव फारुक शेख यांनी उपस्थित सर्व आलिम,उलेमा व मौलाना यांचे स्वागत करून उपस्थितांना त्यांचा परिचय करून दिला. ट्रस्टचे अध्यक्ष अल्हाज अब्दुल गफ्फार मलिक यांनी प्रास्ताविक केले.
            शहर काजी मुफ़्ती अतिकउर रहमान यांनी मार्गदर्शन केले व ईद सोमवारी होईल असे घोषित केले. यावेळी मुफ़्ती अबुजर,मुफ़्ती हंजला, मुफ़्ती अबुजर,मौलाना नदीम अख्तर, मौलाना हाफिज जाहिद, कारी अशफाक,मौलाना रेहान,मौलाना जुबेर,मौलाना शाकिर,मुफ़्ती रेहान,मुफ़्ती हंजला, मौलाना वसीम पटेल,मौलाना नासिर, मौलाना शाकिर अली यांची विशेष उपस्थिती होती
रूहते हिलाल समिती व इदगाह ट्रस्टचे आवाहन
      हिलाल समितीचे सर्व व सन्माननीय उलमा,अलीम व मौलाना मुफ्ती अतीकुर्रहमान तसेच ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक व सचिव फारुक शेख यांनी मुस्लीम समुदायांस आवाहन केले आहे की की नमाज आपापल्या घरीच अदा करावी, कोणीही ही ईदगाह मध्ये येता कामा नये. तसेच कोणीही रस्त्यावर येऊन ईद मुबारक साठी गर्दी करू नये. एकमेकास गळाभेट अथवा हस्तांदोलन (मुसाफा) घेऊ नये आपली स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी व अल्लाकडे एकच प्रार्थना करावी की आम्हाला व विश्वातील संपूर्ण मानव जातीला या कोरोना व्हायरस पासून मुक्ती दे व या  कोरोना व्हायरसचा नायनाट कर.
सभेत यांचीही उपस्थिती
         ट्रस्टचे अनिस शाह, मजहर नजीर मुलतान,रियाज़ मिर्ज़ा, ताहेर शेख, याकूब खाटीक तसेच सय्यद चाँद, वहाब मालिक, इक़बाल वजीर,शकील सर, अज़ीज़ हामिद,कुद्दुस शेख,तय्यब शेख,शाकिर मुलतानी, शाहिद सैय्यद,ज़ाकिर बागवान,आदींची उपस्थिती होती.
घरीच नमाज अदा करण्याचे अमळनेर पोलीसांचे आवाहन
          अमळनेर येथील मुस्लीम  सामाजिक कार्यकर्ते व बांधवांची बैठक घेऊन उपविभागीय पोलीस  अधिकारी राजेंद्र ससाणे व पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. कोरोना आजाराच्या या संकटमय पार्श्वभूमीवर सर्व समाज बांधवांनी  आपल्या घरात राहून घरीच ईदची नमाज अदा करावी व ईद साजरी करावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सपोनि एकनाथ ढोबळे, पोलीस कर्मचारी,अजरोद्दीन नुरी,राजू शेख,रफिक तेली,कादर जनाब,मोना शेख,मौलाना फयाज,डॉ.फयाज,सैय्यद शौकत अली,सलीम शेख आदी मुस्लीम कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.