सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून आमदारांची बदनामी करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

---------------------------------------------------------------------------
          - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------------------
अमळनेर -
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून आमदार अनिल पाटील यांची बदनामी करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने निवेदनाद्वारे केली आहे.
         अमळनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्याकडे शुक्रवारी दुपारी निवेदन देऊन राष्ट्रवादी विद्यार्थी  काँग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांनी   गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.  दिनेश पाटील या तरुणावर आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या बद्दल  फेसबुक अकाउंटवर सतत आक्षेपार्ह पोस्ट करून बदनामी करणाऱ्या तरुणावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष भुषण भदाने,विद्यार्थी शहराध्यक्ष सुनिल शिंपी,सोशल मीडिया अध्यक्ष राहुल गोत्राळ,मनोज ठाकरे,शुभम पाटिल आदींनी केली आहे.यासह शहरातील विरोधक बदनामी कारक पोस्ट शेअर करीत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा सदर अकौंट तपासणी सुरू असून यातील पोस्ट करणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
-----------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.