ब्रेकिंग बॅड न्युज अमळनेरात आज १३ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले अमळनेर तालुक्यातील एकूण रूग्ण संख्या १३२ झाली आजपासून सात दिवस जनता कर्फ्यु - नागरिक व व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन

--------------------------------------------------------------------------
            - * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------
अमळनेर - 
तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या आज दि.३० मे रोजी आलेले तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर एकूण  १३२ झाली आहे. तर आज १३ तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या बातमीमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून या  पार्श्वभूमीवर आजपासून पुढील सात दिवस जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे. 
     अमळनेर तालुक्यात आज १३ रुग्ण नवीन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात फरशी रोड, देशमुख वाडा,आर के नगर/ शिरूड,गुलमोहर कॉलनी, सिंधी कॉलनी,वाणी मंगल कार्यालय समोर,प्रताप नगर,शिवशक्ती चौक या भागातील प्रत्येकी १ व झामी चौक ३ असे एकूण ११ आणि या आधी पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रूग्णांच्या संपर्कातील कासार गल्ली आणि पान खिडकी या दोन्ही भागातील प्रत्येकी १ असे एकूण १३ रुग्ण  आज आढळले. 
जनता कर्फ्यु १०० टक्के यशस्वी करावा
    काही दिवसांपासून पॉझिटीव्ह रूग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले होते त्यामुळे नागरिक व प्रशासनास दिलासा मिळाला होता. पण आज मोठ्या प्रमाणात संख्या आढळून आल्याने सर्वच धास्तावले आहेत. या संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन प्रशासनाने आजपासून दि. ६ जून पर्यंत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कोणतेही दुकान व सेवा १०० टक्के बंद ठेवून नागरिक व व्यावसायिकांनी हा जनता कर्फ्यु यशस्वी करावा. तसेच नागरिकांनी अतिशय महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, बाहेर निघतांना मास्क किंवा रूमालाचा वापर करावा व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये,प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अमळनेर शहरातील वाढती रूग्ण संख्या पहाता या जनता कर्फ्यु काळात सर्व प्रशासकीय यंत्रणा कठोर पावले उचलणार आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणारे नागरिकांना 
कारवाईस सामोरे जावे लागेल तरी जनतेने १०० टक्के जनता कर्फ्यु यशस्वी करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
----------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.