मुख्याध्यापक विश्वासराव पाटील सेवानिवृत्त संस्थेचे पदाधिकारी व सहका-यांनी भावी आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा

Sunday, May 31, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर-
  तालुक्यातील मुडी येथील ग्रामविकास शिक्षण संस्था संचलित भिकारी सदाशिव हायस्कूल कोळपिंप्री शाळेचे मुख्याध्यापक विश्वासराव वामनराव पाटील हे आपल्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून आज दि. ३१ मे २०२० रोजी सेवानिवृत्त झाले.
          श्री विश्वासराव पाटील यांनी ग्रामविकास शिक्षणसंस्थेच्या सर्व शाळांमध्ये प्रामाणिक सेवा दिली.सुरवातीचा काही काळ त्यांनी शिक्षक म्हणून काम पाहिले व नंतर सेवाजेष्ठतेनुसार त्यांना मुख्याध्यापक या पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी सुद्धा प्रामाणिक काम करून ते आज  सेवानिवृत्त  झाले आहेत. त्या बद्दल ग्राम विकास शिक्षण संस्था मुडी संस्थेचे अध्यक्ष,सचिव, कायम संचालक, सदस्य, पदाधिकारी, व सर्व शाळांचे मुख्याध्यापक,
शिक्षक आणि शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.सेवा निवृत्ती नंतरच्या त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना अमळनेर हेडलाइन्स परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines