अमळनेर - तालुक्यातील कुर्हे खु.॥ येथील रहिवाशी व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील केंद्र प्रमुख राजेंद्रसिंह पाटील हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून आज सेवा निवृत्त झाले.
श्री राजेंद्रसिंह पाटील यांनी सन १९८८ मध्ये एम.कॉम., डी.एड.व बी.एड.पर्यंत शिक्षण पूर्ण करुन शिक्षक म्हणून पारोळा तालुक्यातील आडगांव येथून नोकरीला सुरवात केली. आज दि.३१ मे रोजी अमळनेर तालुक्यातील फापोरे बु.॥ येथे केंद्र प्रमुख म्हणून राजेंद्रसिंग पाटील हे ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले आहेत.
त्यांनी पारोळा तालुक्यात नेरपाट, अमळनेर तालुक्यात पदोन्नतीनेे फापोरे बु.॥ येथे बदली होऊन केंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर २ वर्ष चाळीसगांव येथे प्रशासकीय बदलीने व पुन्हा अमळनेर तालुक्यात केंद्र प्रमुख म्हणून काम पहिले. एकूण ३२ वर्ष नोकरी करुन फापोरे केंद्र प्रमुख म्हणून सेवा निवृत्त झाले त्यांनी प्रामाणिक सेवा दिली. सुरूवातीचा काही काळ त्यांनी शिक्षक म्हणून काम पाहिले व सेवाजेष्ठते नुसार त्यांना केंद्र प्रमुख या पदावर काम करण्याची संधी मिळाली त्या ठिकाणी सुद्धा प्रामाणिक काम करून ते आज सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांना सेवा निवृत्तीबद्दल सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक - शिक्षिका कर्मचारी यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आहेत.
No comments
Post a Comment