अमळनेरात गावठी दारू,गांजासह तब्बल ४८ लाखाची रोकड जप्त अमळनेर पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात आढळले घबाड

Tuesday, May 19, 2020

/ by Amalner Headlines
---------------------------------------------------------------------
           -* जाहीरात * -
----------------------------------------------------------------------
अमळनेर -
आज दुपारी अमळनेर शहरातील बहादरपूर रोड परिसरात पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात गावठी दारू,गांजा व अन्य साहित्यासह तब्बल ४८ लाख रुपये रोख रक्कम असा सुमारे ४९ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.तर तीन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
        याबाबतची अधिक माहिती अशी की,आज अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी जळगावजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याशी फोनवर संपर्क साधून गोपनीय माहिती कळवली. डॉ.उगले यांनी दिलेल्या निर्देशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांच्या सूचनेप्रमाणे पथक तयार करण्यात आले. सदरच्या पथकाने अमळनेर शहरातील बहादरपूर रोड येथील कंजर वाड्यातील अवैद्य धंद्याविरुद्ध कारवाई केली. 
काय आढळले छाप्यात
     पथकाने टाकलेल्या या छाप्यात गांजा २ किलो,(अंदाजे किंमत ४० हजार रुपये), गाभा १५००  लिटर कच्चे रसायन,
(रक्कम २५०००/- रुपये)
 १५०लिटर गावठी दारू 
(रक्कम ३०००/- रुपये)
तलवार (रक्कम ९००/- रूपये)
आणि रोख रक्कम ४८ लाख ४१ हजार  ६८० रुपये असा एकूण ४९ लाख १० हजार ५८० रुपयेचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
                
या घटनेप्रकरणी सुलोचना हसमुख बागडे,रेखा श्रीकांत कंजर,भारती जब्बार बागडे (रा.बहादरपूर रोड कंजर वाडा) या तीन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
  पथकात यांचा सहभाग
    या कारवाईमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र ससाणे, पोलिस निरीक्षक अंबादास मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ ढोबळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी  संदीप वायाळ,पोलीस हवालदार दिपक विसावे,भटूसिंह तोमर, शरद पाटील,दिपक माळी,रवींद्र पाटील,किशोर पाटील,हितेश चिंचोरे,राहुल चव्हाण,विलास बागुल,विनोद धनगर, व किरण धनगर (महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग) महिला पोलीस रेखा ईशी, आम्रपाली पालवे, शामल पारधी आणि पंच म्हणून
भूपेंद्र बाविस्कर व जितेंद्र पवार इत्यादींनी कारवाईत सहभाग घेतला.
--------------------------------------------------------------------
ओम टी पान मसाला च्या नविन दालन

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines