अतिशय धक्कादायक अमळनेरात आज एकोणीस कोरोना बाधित रूग्ण आढळले उद्यापासून पाच दिवस तालुक्यात जनता कर्फ्यु आ.अनिल पाटील यांनी आज सकाळी तातडीने बोलावली प्रशासकीय बैठक

-------------------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------------
अमळनेर -
जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या ८४ कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल  काल रात्री प्राप्त झाले. त्यापैकी ६५ व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून एकोणीस  व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात अमळनेर येथील १९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. काल दुपारी एक व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आला होता. तर रात्री  रूग्ण संख्या वाढल्याने अमळनेर तालुक्यात आजपासून पुढील पाच दिवस जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे. आ.अनिल पाटील यांनी आज (दि.७ मे) रोजी सकाळी तातडीने प्रशासकीय बैठक बोलावली आहे.
अमळनेर-१९..अरे बापरे..!
                 काल रात्री पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील एका व्यक्तीचा तर अमळनेर येथील अठरा व्यक्तींचा समावेश आहे. यात बहुतांश रूग्ण हे कॅन्टोनमेंट झोन मधीलच असल्याचे समजते.    
                                                                                                जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ८५  इतकी झाली असून त्यापैकी १४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील वृध्द महिलेसह दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे. 
आजपासून ५ दिवस जनता कर्फ्यु
        काल रात्री कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून त्या पार्श्वभूमीवर आजपासून पुढील पाच दिवस तालुक्यात जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केले आहे.


 
आज सकाळी तातडीची बैठक
        आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आज सकाळी १० वाजता सर्व प्रशासकीय विभागांची तातडीची बैठक बोलावली आहे.
  * आवाहन * -
बंधू आणि भगिनींनो....!
घाबरू नका पण जागरूक रहा.
मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंगचे  पालन करा.
लाॅकडाऊन पाळा, कोरोना टाळा.
------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.