
-------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------
जळगाव व अमळनेर येथील रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या २० कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल आज रात्री प्राप्त झाले. यापैकी १६ व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर ४ व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या चार व्यक्तीमध्ये ३१, ४३ व ६० वर्षीय महिलांचा तर ४८ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. हे चारही रूग्ण अमळनेर येथील आहेत. निगेटिव्ह व्यक्तीमध्ये १४ व्यक्ती या अमळनेर येथील तर दोन व्यक्ती जळगाव च्या आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५७ इतकी झाली आहे. त्यापैकी १३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. या बातमीमुळे नागरिकांत खळबळ उडाली आहे. या रूग्णांच्या रहिवासाचा परिसर या आधीच कॅन्टोनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे.
तसेच मुळचा अकोला जिल्ह्यातील चिंचोली येथील पण सध्या समता नगर,जळगाव येथील रहिवासी असलेल्या ५० वर्षीय पुरुषही पॉझिटीव्ह आढळून आला आहे. तर ३७ अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
------------------------------------------------------------------------------



ओम टी पान मसाला च्या नविन दालन

