कॅन्टोनमेंट झोनमध्ये प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप औषध वाटणा-या स्वयंसेवकांना सुरक्षेसाठी साहेबराव दादांनी स्वखर्चाने दिले सॅनिटायजर

---------------------------------------------------------------------------
         - * जाहीरात * -
------------------------------------------------------------------------
अमळनेर - 
 कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे अमळनेर तालुक्यात रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली.  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रशासनाने रूग्ण आढळलेल्या परिसरात कॅन्टोनमेंट झोन  घोषित केले. या कॅन्टोनमेंट  झोनमधील व्यक्तींची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी शासनामार्फत पुरविणेत आलेले अर्सेनिक अल्बम ३० हे औषध दि.२२ मे २०२० रोजी सकाळी  साळी वाडा, दुरदर्शन केंद्र, प्रताप नगर,न.पा. कार्यालय समोरील भाग,तांबेपुरा,पैलाड,सानेनगर, अमलेश्वर नगर,इस्लामपुरा या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सुमारे  ७००० कुटुंबियांसाठी एकूण  १५० स्वयंसेवकांमार्फत घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले आहे. तसेच औषधे कशी घ्यावीत याची माहिती देण्यात आली. 
     वरील सर्व १५० स्वयंसेवकांना स्वयंसुरक्षेसाठी मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्याकडून  प्रत्येकी एक सॅनिटायजर बाटली वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी  मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील,प्रांताधिकारी सिमा अहिरे,तहसिलदार मिलिंद वाघ, नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,नगरपरिषद गटनेते प्रविण पाठक,नगरपरिषद प्रशासन अधिकारी संजय चौधरी,  डाॅ.विलास महाजन, महेश जोशी उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.